'अभिव्यक्ती' अभिनय तथा नाट्यनिर्मिती प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Saturday, August 8, 2026

'अभिव्यक्ती' अभिनय तथा नाट्यनिर्मिती प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न



अमरावती ८ :
अमरावती स्पंदन परिवार बहुउद्देशीय संस्था संचलित Being Artist Academy of Film & Theatre Arts यांच्या वतीने आयोजित 'अभिव्यक्ती' अभिनय तथा नाट्यनिर्मिती प्रशिक्षण कार्यशाळा दि. १६ जुलै ते ५ ऑगस्ट या कालावधीत उत्साहात पार पडली. मर्यादित प्रवेश असलेल्या या कार्यशाळेत अमरावती जिल्ह्यातील विविध भागांतील प्रशिक्षणार्थींनी सहभाग नोंदविला.

कार्यशाळेत अभिनयाची मूलतत्त्वे, संवादफेक, शरीरभाषा, आवाजावरील नियंत्रण, भावाभिव्यक्ती, रंगमंचावरील वावर, पात्रनिर्मिती, प्रसंग सादरीकरण, नाट्यनिर्मिती प्रक्रिया तसेच कॅमेऱ्यासमोरील अभिनयाची तांत्रिक माहिती यांचे प्रशिक्षण देण्यात आले. प्रात्यक्षिके, नाट्यखेळ, गटचर्चा आणि प्रत्यक्ष एकांकिका निर्मितीच्या माध्यमातून प्रशिक्षणार्थींना अनुभवाधारित शिक्षण देण्यात आले.


यावेळी अभिनय व नाटकाची संकल्पना, संहितालेखनापासून मंचनापर्यंतची नाट्यनिर्मिती प्रक्रिया, संवादकौशल्य, लोकशिक्षण, समाजप्रबोधन, व्यक्तिमत्त्व विकास, नाट्यक्षेत्रातील करिअरच्या संधी तसेच शासनाच्या विविध योजना, अर्थसहाय्य आणि अनुदान याविषयीही मार्गदर्शन करण्यात आले.


"नाटक हे केवळ अभिव्यक्ती किंवा लोकरंजनाचे माध्यम नसून व्यक्तीच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासाचे प्रभावी साधन आहे," असे संस्थेचे अध्यक्ष व कार्यशाळेचे प्रमुख प्रशिक्षक पंकज धंदर यांनी सांगितले.


कार्यशाळेच्या आयोजनाची जबाबदारी संस्थेच्या सचिव तथा अकादमीच्या संचालिका स्नेहा वासनिक यांनी सांभाळली. संदेश बायस्कर, पवन वाकोडे, अक्षय बकसरे, साक्षी जिभकाटे, विज्ञप्ती पर्वतकर, योगेश लोन्दे, नवीन गुडधे, आराध्य इसळ, सम्यक खडसे, प्रवीण वानखडे आणि श्रुतिका दंदे यांनी कार्यशाळेत सहभाग घेतला.

सहभागी विद्यार्थ्यांनी अशा प्रशिक्षण उपक्रमांचे सातत्याने आयोजन करण्याची अपेक्षा व्यक्त केली. भविष्यात अधिक व्यापक प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.


Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages