डी.एल.एड. जून २०२६ परीक्षेचा निकाल जाहीर; ५३.७४ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Saturday, August 8, 2026

डी.एल.एड. जून २०२६ परीक्षेचा निकाल जाहीर; ५३.७४ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण

     अमरावती, दि. ८ : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात आलेल्या डी.एल.एड. (D.El.Ed.) जून २०२६ परीक्षेचा निकाल शुक्रवार, दि. ७ ऑगस्ट रोजी सकाळी ४ वाजता परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर करण्यात आला आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष डॉ. नंदकुमार बेडसे यांनी दिली आहे.

          डी.एल.एड. द्वितीय वर्षाची परीक्षा हि मराठी, उर्दू, हिंदी, इंग्रजी व कन्नड या पाच माध्यमांसाठी  दि. २ ते १० जून या कालावधीत घेण्यात आली होती. या परीक्षेसाठी एकूण १९ हजार ९४१ विद्यार्थी नोंदणीकृत होते. त्यापैकी १९ हजार ४१३ विद्यार्थी परीक्षेस उपस्थित राहिले, तर ५२८ विद्यार्थी अनुपस्थित होते. एकूण १० हजार ७१६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, निकालाची एकूण उत्तीर्ण टक्केवारी ५३.७४ टक्के आहे.

          माध्यमनिहाय निकालामध्ये उत्तीर्ण झालेल्यांचे प्रमाण अनुक्रमे मराठी माध्यमाचे निकाल ५०.७३ टक्के, उर्दू माध्यमाचे ६२.५६ टक्के, हिंदी माध्यमाचे ६७.१८ टक्के, इंग्रजी माध्यमाचे ६०.९९ टक्के, तर कन्नड माध्यमाचा निकाल सर्वाधिक ७७.२७ टक्के लागला आहे.

          विद्यार्थ्यांना निकालाचे मूळ गुणपत्रक संबंधित अध्यापक विद्यालयामार्फत यथावकाश उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच उत्तरपत्रिकेची गुणपडताळणी तसेच उत्तरपत्रिकेची छायाप्रत मिळविण्यासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख २४ ऑगस्ट २०२६ आहे. विद्यार्थ्यांनी निकाल पाहण्यासाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या www.mscepune.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

 


Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages