समुपदशेन केंद्रासाठी सामाजिक संस्थांना अर्ज करण्याचे आवाहन - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Monday, August 31, 2026

समुपदशेन केंद्रासाठी सामाजिक संस्थांना अर्ज करण्याचे आवाहन


मुंबई, दि. १ : महिला व बालकांवर होणाऱ्या अत्याचारास प्रतिबंध करण्यासाठी मुंबई उपनगर जिल्ह्यात भांडूप पोलीस स्टेशन येथे महिला समुपदेशन केंद्र सुरू करण्यात येणार आहे. या केंद्रासाठी सामाजिक संस्थांनी पुढील दहा दिवसांत अर्ज करावेत, असे आवाहन मुंबई उपनगर जिल्ह्याचे महिला व बालविकास अधिकारी यांनी पत्रकाद्वारे केले आहे.

समुपदेशन केंद्रासाठी अटी  व शर्ती पूर्ण करणाऱ्या नोंदणीकृत संस्थांचा विचार करण्यात येईल तसेच मुंबई उपनगर जिल्ह्यातील (स्थानिक) तसेच महिला पदाधिकारी असल्यास प्रथम प्राधान्य देण्यात येणार असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.

समुपदेशन केंद्रासाठी तीन वर्षाचा महिला समुपदेशन क्षेत्रातील अनुभव आवश्यक तसेच समुपदेशनासाठी एमएसडब्ल्यू उत्तीर्ण, दोन कर्मचारी यांची यादी व कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे. संस्थेची घटना व नियमावली आवश्यक असून ज्यामध्ये महिलांसाठी समुपदेशन केंद्र चालवणे हा उद्देश असावा. सनदी लेखापालांची स्वाक्षरी असलेला मागील तीन वर्षाचा अहवाल, संस्थेचे मागील तीन महिन्यांचे महिनानिहाय बँक स्टेटमेंट, संस्थेचे कार्यरत पदाधिकारी यांचे नाव, पत्ता, दूरध्वनी क्रमांक यादी, संस्थेच्या कार्यकारी मंडळातील सदस्य एकमेकांचे नातेवाईक नसल्याचे हमीपत्र, संस्थेने सार्वजनिक संपत्तीचा अपहार केला नसल्याबाबतचे जिल्हाधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र, उपविभागीय पोलीस अधिकारी यांचे प्रमाणपत्र, ज्या स्वयंसेवी संस्थांनी समुपदेशन केंद्रासाठी यापूर्वी प्रस्ताव सादर केले होते त्यांनीही पुन्हा नव्याने प्रस्ताव सादर करणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय मुंबई उपनगर, प्रशासकीय इमारत, चेंबूर येथे संपर्क साधावा अशी, माहिती जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांनी दिली आहे.


Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages