संघटन बळकटीसाठी पदाधिकाऱ्यांना दिशादर्शन - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Friday, July 17, 2026

संघटन बळकटीसाठी पदाधिकाऱ्यांना दिशादर्शन

 


भाजपाची खामगाव जिल्हा संघटनात्मक बैठक उत्साहात

एसआयआर संदर्भातील मार्गदर्शन, आगामी नियोजनावर सविस्तर चर्चा

शेगाव, १७ जुलै

(ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क)

भारतीय जनता पार्टी खामगाव जिल्हयाची महत्त्वपूर्ण संघटनात्मक बैठक १५ जुलै रोजी येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. संघटन अधिक सक्षम, सशक्त व गतिमान करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या बैठकीत एसआयआर संदर्भातील विविध मुद्यांवर सखोल मार्गदर्शन करण्यात आले. तसेच आगामी काळातील संघटनात्मक नियोजन, कार्यपद्धती आणि  प्रभावी उपस्थित अंमलबजावणीबाबत पदाधिकान्यांना आवश्यक सूचना व दिशा देण्यात आल्या आहे.

बैठकीला महाराष्ट्र प्रदेश एसआयआर प्रमुख भगवानदास सबनानी, दिनेश सूर्यवंशी तसेच निवेदिता विखळे (चौधरी) सचिन देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांनी संघटनात्मक कार्य अधिक प्रभावी करण्यासाठी बूथस्तरावरील कार्यकर्त्याची भूभिका, समन्वय, जनसंपर्क आणि नियोजनबद्ध कामकाजाचे महत्त्व अधोरेखित केले आहे.

यावेळी विधानसभा मतदारसंघातील बीएलए१, जिल्हा पदाधिकारी, मंडल अध्यक्ष, मंडल पदाधिकारी तसेच विविध आघाड्यांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकी दरम्यान उपस्थितांनी संघटनात्मक कामकाजाशी

संबंधित विविध विषयांवर चर्चा केली तसेच आगामी उपक्रमांच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी आवश्यक नियोजन निश्चित करण्यात आले आहे.

प्रमुख मार्गदर्शकांनी पक्षाची विचारधारा अधिक प्रभावीपणे जनतेपर्यत पोहोचविणे, प्रत्येक बूथवर संघटन मजबूत करणे आणि कार्यकर्त्यांमध्ये समन्वय वाढविणे यावर विशेष भर दिला. आगामी काळात पक्षाचे संघटन अधिक गतिमान करण्यासाठी प्रत्येक पदाधिकान्याने जबाबदारीने कार्य करण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले आहे.

संघटन बळकट करण्याच्या दृष्टीने आयोजित ही बैठक अत्यंत महत्त्वाच मार्गदर्शक, सकारात्मक आणि अमृल्य ठरल्याची भावना उपस्थित पदाधिकान्यांनी व्यक्त केली आहे.

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages