कौटुंबिक नात्यांमधील कटू वास्तव: ६४ टक्के प्रकरणांमध्ये 'सुनाच' करतात वृद्धांचा छळ - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Monday, June 15, 2026

कौटुंबिक नात्यांमधील कटू वास्तव: ६४ टक्के प्रकरणांमध्ये 'सुनाच' करतात वृद्धांचा छळ

 

हेल्पएज इंडियाचा धक्कादायक खुलासा
दि.१५ मुंबई,  ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क:- 
ज्या घरात वृद्धांचे आशीर्वाद घेतले जातात, त्याच घरात आज त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. 'हेल्पएज इंडिया' या संस्थेने देशातील प्रमुख २३ शहरांमध्ये केलेल्या एका देशव्यापी सर्वेक्षणातून अत्यंत वेदनादायी आणि धक्कादायक निष्कर्ष समोर आले आहेत. घरातील ज्येष्ठ नागरिकांची पिळवणूक आणि छळ करण्याच्या प्रकरणांमध्ये चक्क ६४ टक्के सुना जबाबदार असल्याचे या सर्वेक्षणात निष्पन्न झाले आहे, तर मुलांचे हेच प्रमाण ४४ टक्के इतके आहे.
आज १५ जून रोजी जगभरात ‘जागतिक ज्येष्ठ नागरिक छळ विरोधी जागरूकता दिन’ पाळला जात असताना, हे सर्वेक्षण कौटुंबिक नात्यांमधील वाढती दरी आणि वृद्धांची असुरक्षितता चव्हाट्यावर आणणारे ठरले आहे.
वाढती असुरक्षितता
 देशातील प्रत्येक पाचव्या वृद्धाची (एक पंचमांश) कोणत्या ना कोणत्या मार्गाने पिळवणूक होत आहे. या सर्वेक्षणात ५०० ज्येष्ठांशी थेट संवाद साधण्यात आला, ज्यातून खालील प्रमुख कारणे आणि छळाचे प्रकार समोर आले:

घरातील वर्चस्वाची लढाई: जोडीदार गमावल्यामुळे येणारे एकटेपण आणि मुला-सुनेचे घरातील वाढते वर्चस्व यामुळे वृद्ध मानसिकदृष्ट्या खचत आहेत.
भावनिक आधार शोधणारे वृद्ध जेव्हा स्वतःच्याच घरात उपेक्षित ठरतात, तेव्हा त्यांच्यात सामाजिक असुरक्षिततेची भावना वाढीस लागते. हा केवळ एका कुटुंबाचा प्रश्न नसून ढासळत चाललेल्या कौटुंबिक मूल्यांचे लक्षण आहे. कायद्याचे संरक्षण असले, तरी जोपर्यंत मुला-सुनांच्या मानसिकतेत आणि संस्कारांत बदल होत नाही, तोपर्यंत वृद्धांचा हा छळ थांबवणे कठीण आहे, असा सूर या अहवालातून निघत आहे.

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages