धारणी दिनांक 15 जून
मेळघाटातील माजी आमदार आणि पटल्या गुरुजी म्हणून ओळख असलेले पटल्या लंगडा मावसकर यांचे वयाच्या 80 व्या वर्षी दुःखद निधन झाले. त्यांना परिसरात आबा म्हणून ओळख होती. आबा हे आदिवासी भाषांमध्ये वडिलांना संबोधित करण्यात येणारे नाव आहे.
पटल्या गुरुजी हे धारणी शहरात अनेक वर्षापासून वास्तव्यात होते. ते मूळचे तालुक्यातील लाकटू या गावातील. ते जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षक होते. म्हणून त्यांना आदराने पटल्या गुरुजी असे म्हटले जाते.
त्यांनी भाजप सेनेच्या युती शासनामध्ये 1995 मध्ये भाजप तर्फे निवडणूक लढवून विजयश्री प्राप्त केले होते. ते भाजपचे पहिले गैर काँग्रेसचे आमदार होते. आमदारकीचे कार्यकाळ संपल्यानंतर ते धारणी येथे जयस्तंभ चौकात सर्वसामान्य नागरिकांप्रमाणे राहत होते. येण्या जाणाऱ्यांना ते मोठ्या आदराने "राम राम भगवान "असे अभिवादन करीत होते. त्यांच्या निधनाने मेळघाटात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांचे पुत्र माजी सहाय्यक महसूल आयुक्त रमेश पटल्या मावसकर आहेत. त्यांची अंतिम यात्रा राहते घर सिविल लाईन धारणी येथून आज सायंकाळी पाच वाजता हिंदू समशान भूमी येथे निघणार असल्याचे रमेश मावसकर यांनी कळविले आहे.