*ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन
अमरावती, दि. ९ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क) : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर 125 वी जयंतीनिमित्त मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह, अमरावती' येथे शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या प्रवेशासाठी विद्यार्थिनींना ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावे लागणार आहेत.
मागासवर्गीय विद्यार्थिनींनी चालू शैक्षणिक वर्षात अमरावती शहरातील महाविद्यालयांमध्ये किंवा संस्थांमध्ये प्रथम वर्षात प्रवेश घेतला आहे, त्या अर्ज करण्यास पात्र आहेत. यात अकरावी, पदवी, पदविका, आयटीआय प्रवेश घेतलेल्यांना प्रवेश मिळणार आहे. वसतिगृहात प्रवेश मिळणाऱ्या विद्यार्थिनींना मोफत निवास, राहण्याची उत्तम व्यवस्था, मोफत भोजन व्यवस्था, स्टेशनरी भत्ता, ड्रेसकोड भत्ता, शैक्षणिक सहल आणि प्रोजेक्ट्स (प्रकल्प) खर्च, या सुविधा पूर्णपणे मोफत पुरवल्या जाणार आहेत.
अर्ज करताना विद्यार्थिनींनी उत्पन्नाचा दाखला, मागील वर्षाच्या गुणपत्रकेची झेरॉक्स प्रत, जात प्रमाणपत्र, ही कागदपत्रे सादर करावी लागणार आहे. इच्छुक आणि पात्र विद्यार्थिनींनी प्रवेशासाठी hmas.mahait.org या संकेतस्थळाला भेट देऊन ऑनलाईन अर्ज सादर करावा, असे आवाहन शासकीय वसतिगृहाच्या गृहप्रमुखांनी केले आहे.
Post a Comment
0 Comments