*‘एक झाड, एक जबाबदारी’चा संदेश देत वृक्षारोपण उपक्रम*
अमरावती, दि. ६ जून : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त अमरावती रेल्वे स्थानक परिसरात वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या अंतर्गत कार्यरत डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे व अमरावती रेल्वे स्थानक यांच्या संयुक्त विद्यमाने *स्टेशन प्रबंधक महेंद्र लोहकरे व प्रकल्प अधिकारी अनिता गवई* मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला.
या कार्यक्रमात *स्टेशन प्रबंधक महेंद्र लोहकरे, परिवहन निरीक्षक प्रदीप तामगाडगे, स्वास्थ्य निरीक्षक अतुल सूर्यवंशी, मुख्य तिकीट निरीक्षक एस. पी. कुरहाडे, प्रभाकर खेतकडे, एस.एस.ई. (C&W) नितीन रामटेके, एस.एस.ई. (ETL) ज्ञान प्रकाश, सीबीपीएस अजय साहू, ए.एस.आय. शुक्लाजी, सतीश लांजेवार, एहसान, आकाश बोयत, हाऊसकीपिंग स्टाफ तसेच विविध विभागातील कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले.
बार्टीच्या वतीने अनिता गवई-राऊत (जिल्हा प्रकल्प अधिकारी, बार्टी) यांच्या नेतृत्वाखाली समतादूत पूजा गौतम, भावना वासनिक, शुभांगी बोराळकर, ऊषा मेश्राम, स्मिता मोरे, सोनाली रंगारी, सरोज होरे आणि सागर जाखोटिया यांनी सक्रिय सहभाग नोंदविला.
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण कार्यक्रम हा माननीय दीपा मुधोळ मुंडे महासंचालक बार्टी , पुणे,
माननीय सुचिता शिंदे निबंधक, बार्टी ,तसेच डॉक्टर बबन जोगदंड , विभाग प्रमुख सेवा व विस्तार , बार्टी, पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला.
पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत स्थानक परिसरात विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड करण्यात आली. उपस्थित मान्यवरांनी वृक्षसंवर्धनाची जबाबदारी स्वीकारत पर्यावरण संरक्षणासाठी प्रत्येक नागरिकाने सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन केले.
‘एक झाड, एक जबाबदारी’ हा संदेश देत आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमातून पर्यावरण संरक्षणाबाबत जनजागृती करण्यात आली. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त देशभरात वृक्षारोपण व पर्यावरण जनजागृतीचे विविध उपक्रम राबविले जात असून, रेल्वे प्रशासनाकडूनही अशा हरित उपक्रमांना सातत्याने प्रोत्साहन दिले जात आहे.
वृक्षारोपणानंतर उपस्थितांनी लावलेल्या वृक्षांचे संगोपन करण्याचा संकल्प करून पर्यावरण संवर्धनासाठी आपले योगदान देण्याची प्रतिज्ञा केली.
Post a Comment
0 Comments