Type Here to Get Search Results !

Gramin Uday Logo

Gramin Uday Logo

*अमरावती शाखेचा राज्यस्तरीय दुहेरी गौरव; लक्ष्यवेधी शाखा व लक्ष्यवेधी कार्यकर्ता पुरस्कार प्राप्त*







देणगीदार, वर्गणीदार, जाहिरातदार, सहकार्यकर्ते, पदाधिकारी, साथी सदस्य व समविचारी संघटनांच्या सामूहिक कार्याचा गौरव

अहिल्यानगर, दि.८ जून : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या विस्तारित राज्य बैठकीत अमरावती शाखेच्या उल्लेखनीय कार्याची राज्यस्तरावर दखल घेत "लक्ष्यवेधी शाखा २०२६" हा पुरस्कार महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, अमरावती शाखेला प्रदान करण्यात आला. तसेच अमरावती जिल्हा कार्याध्यक्ष साथी प्रफुल्ल मंदा श्रीधर (कुकडे) यांना त्यांच्या प्रभावी संघटनात्मक, प्रबोधनात्मक आणि विज्ञाननिष्ठ कार्याबद्दल "लक्ष्यवेधी कार्यकर्ता २०२६" या प्रतिष्ठेच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
अहिल्यानगर येथील बडी साजन मंगल कार्यालयात ६ जून रोजी आयोजित महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या तीन दिवशीय विस्तारित राज्य बैठकी दरम्यान हा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला. मा. सुभाष वारे (जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते पुणे) यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी मा. सुभाष लोमटे (जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते पुणे) यांची उपस्थिती लाभली. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्याध्यक्ष मा. माधव बावगे यांची प्रमुख उपस्थिती होती, तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मा. संजय बनसोडे (राज्य कार्याध्यक्ष, महा. अनिस) यांनी भूषविले.
गेल्या वर्षभरात अमरावती जिल्ह्यात अंधश्रद्धा निर्मूलन, वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रचार-प्रसार, संविधान मूल्यांची जपणूक, सामाजिक प्रबोधन, जनजागृती अभियान, संघटन विस्तार, प्रशिक्षण उपक्रम तसेच विविध सामाजिक प्रश्नांवरील हस्तक्षेप यासाठी राबविण्यात आलेल्या कार्याची दखल घेत अमरावती शाखेला हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
"लक्ष्यवेधी शाखा २०२६" हा पुरस्कार अमरावती शाखेच्या वतीने नरेंद्र धर्माळे, विजय डवरे, दिलीप लाडे, सचिन खोब्रागडे, मंजू वासनिक, दिगंबर मेश्राम, निखिल विल्हेकर, कुलदीप घरडे, प्रफुल्ल मंदा श्रीधर (कुकडे), विनोद चोंडके, कीर्तिका सयामे आणि गायत्री आडे (महिला कार्यवाह, राज्य) यांनी स्वीकारला.
तसेच जिल्हा कार्याध्यक्ष साथी प्रफुल्ल मंदा श्रीधर (कुकडे) यांना अंधश्रद्धा निर्मूलन चळवळ, वैज्ञानिक जाणीव जागृती, संघटन उभारणी, सामाजिक प्रश्नांवरील, महिला संघटन बाबत सक्रिय भूमिका आणि सातत्यपूर्ण जनसंपर्क यामधील उल्लेखनीय योगदानाबद्दल "लक्ष्यवेधी कार्यकर्ता २०२६" पुरस्काराने गौरविण्यात आले.
या विस्तारित राज्य बैठकीच्या पहिल्या दिवशी अमरावती जिल्ह्याचा वार्षिक अहवाल जिल्हा कार्याध्यक्ष प्रफुल्ल मंदा श्रीधर (कुकडे) यांनी जिल्ह्यातील व राज्यभरातील पदाधिकारी, कार्यकर्ते व साथी यांच्या उपस्थितीत सादर केला. जिल्ह्यात वर्षभरात राबविण्यात आलेल्या विविध सामाजिक, प्रबोधनात्मक, विज्ञाननिष्ठ आणि संघटनात्मक उपक्रमांचा सविस्तर आढावा त्यांनी मांडला. अहवालाचे उपस्थितांनी कौतुक करून अमरावती जिल्ह्याच्या कार्याची दखल घेतली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मा.उत्तम जोगदंड (कार्यकारी संपादक अनिप) यांनी केले. उपस्थितांचा परिचय मा. प्रल्हाद मेस्त्री (सदस्य संपादक मंडळ अंनिप.) यांनी करून दिला, तर आभार प्रदर्शन मा. राजेंद्र फेंगडे (सदस्य संपादक मंडळ अंनिप.) यांनी केले.
या प्रसंगी अमरावती शाखेच्या कार्याला सातत्याने दिशा व मार्गदर्शन करणारे मा. गजेंद्र सुरकार (राज्य प्रधान सचिव) आणि मा. विनायक सावळे (राज्य प्रधान सचिव) यांची विशेष उपस्थिती लाभली. तसेच मा. अजय भालकर(व्यवस्थापकीय संपादक अनिप पत्रिका ),मा. अशोक निकम (राज्यकार्यवाह दस्ताऐवज संकलन विभाग),प्रकाश कांबळे (राज्य सहकार्यवाह वैज्ञानिक जाणीव विभाग )आणि सारिका डेहणकर(राज्य कार्यवाह व्यसनप्रबोधन संघर्ष विभाग )या राज्य पदाधिकाऱ्यांची तसेच  मा. रजनी सुरकार, कल्पना सातव,राज्यातील सर्व विभागातील कार्याध्यक्ष प्रधानसचिव यांची उपस्थितीही उल्लेखनीय ठरली.
पुरस्कार स्वीकारल्यानंतर शाखा प्रतिनिधींनी भावना व्यक्त करताना सांगितले की, हा सन्मान केवळ काही व्यक्तींचा किंवा एका शाखेचा नसून अमरावती विभागातील देणगीदार, वर्गणीदार, जाहिरातदार, सहकार्यकर्ते, पदाधिकारी, साथी सदस्य आणि समविचारी संघटनांच्या सामूहिक परिश्रमांचा गौरव आहे. या सर्वांच्या सहकार्यामुळेच अंधश्रद्धा निर्मूलन, वैज्ञानिक दृष्टिकोन प्रसार आणि समाजप्रबोधनाचे कार्य अधिक व्यापकपणे करता आले.
अमरावती शाखेला प्राप्त झालेला "लक्ष्यवेधी शाखा २०२६" पुरस्कार आणि जिल्हा कार्याध्यक्ष प्रफुल्ल मंदा श्रीधर (कुकडे) यांना मिळालेला "लक्ष्यवेधी कार्यकर्ता २०२६" पुरस्कार हा अमरावती जिल्ह्यातील अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीच्या कार्याची राज्यस्तरीय पावती मानली जात असून या दुहेरी गौरवामुळे जिल्ह्यातील कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. आगामी काळात अधिक जोमाने, अधिक व्यापकपणे आणि विज्ञाननिष्ठ विचारांच्या प्रसारासाठी कार्य करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.पुढील काही महिन्यात लेखन व वाचन कार्यशाळा घेण्याचे नियोजन करू असे व्यक्त करण्यात आले.

Tags

Post a Comment

0 Comments