खरीप हंगामातील 1 कोटी 51 लक्ष रुपयाचे अनधिकृत बियाणे जप्त - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Friday, June 12, 2026

खरीप हंगामातील 1 कोटी 51 लक्ष रुपयाचे अनधिकृत बियाणे जप्त



कृषी विभागाची धडक कारवाई
अनधिकृत खत विक्री
प्रकरणात पाच पोलीस केसेस दाखल


नागपूर दिनांक १२ : खरीप हंगामात बियाणे व खतांचा काळाबाजार थांबविण्यासाठी कृषी विभागाने
विभागात धडक कारवाईला सुरुवात केली आहे. अनधिकृतपणे बियाणे विक्री प्रकरणात 13 हजार 476 पॅकेट व
1 हजार 420 किलो बियाणे जप्त केले असून जप्त केलेल्या बियाण्यांची किंमत एक कोटी 51 लक्ष 33 हजार
रुपये आहे. या प्रकरणात आठ व्यक्तींविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले असल्याची माहिती विभागीय कृषी
सहसंचालक उमेश घाटगे यांनी आज दिली.
अनधिकृतपणे खत विक्री प्रकरणात पाच व्यक्तींविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले असून यामध्ये तीन
मेट्रिक टन साठा जप्त करण्यात आला आहे. केळझर येथे शेतीसाठी असलेला युरिया औद्योगिक वापरात
असल्याचे निदर्शनात आल्यामुळे चार पोलीस केसेस दाखल झाले आहेत.
अनधिकृतपणे बियाणे विक्री संदर्भात नागपूर जिल्ह्यातदोन केसेस दाखल करण्यात आल्या आहे.
आमदाबाद येथील कंपनीचे कापूस बियाणे विक्री संदर्भात 7 हजार 958 पॅकेट जप्त करण्यात आले असून त्याची
किंमत 83 लाख 71 हजार रुपये आहे. वर्धा जिल्ह्यात पुलगाव व आर्वी येथे दोन हजार बियाण्याचे पाकीट जप्त
करण्यात आले असून त्याची किंमत 44 लक्ष रुपये आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात तीन केसेस दाखल करण्यात आल्या आहे.शेगाव, गोंडपिंपरी, व वरोरा येथून 2हजार
641 बियाण्यांचे पॅकेट जप्त करण्यात आले असून त्याची किंमत 24 लक्ष 18 हजार आहे. गडचिरोली जिल्ह्यात
चामोर्शी येथून 35 बियाण्यांची पॅकेट जप्त करण्यात आली असून त्याची किंमत 35 हजार एवढी आहे.
रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांनी बियाणे खरेदी करताना अधिकृत दुकानांमार्फतच व अधिकृत कंपनीचे बियाणे
खरेदी करावे तसेच खरेदी केलेल्या बियाण्यांची पावती घेऊन ती सांभाळून ठेवावी असे आव्हान विभागीय कृषी
सहसंचालक उमेश घाडगे यांनी केले आहे.

विभागात खतांचा चार लक्ष 63 हजार मॅट्रिक टन साठा उपलब्ध

खरीप हंगामासाठी नागपूर विभागात आवश्यकतेनुसार जिल्हा निहाय खतांचा साठा उपलब्ध आहे.
विभागात चार लक्ष 62 हजार 696 मॅट्रिक टन साठा उपलब्ध असून त्यापैकी आतापर्यंत एक लक्ष 75 हजार
134 मेट्रिक टन साठ्याची विक्री झाली आहे. विभागात दोन लक्ष 87 हजार 565 मेट्रिक टन साठा शिल्लक
असल्याची माहिती कृषी सहसंचालक उमेश घाडगे यांनी दिली.
खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना युरिया व डीएपी खतांचा साठा तात्काळ उपलब्ध व्हावा यासाठी
संरक्षित साठा (बफर स्टॉक) उपलब्ध असल्याचे त्यांनी यावेळी सांगितलं. विभागात खरीप हंगामासाठी
20हजार 600 मेट्रिक टन साठा संरक्षित करण्यात आला असून प्रत्यक्ष 19 हजार 465 मेट्रिक टन म्हणजे 94%
युरिया उपलब्ध आहे. डीएपी खताचा संरक्षित साठा 3 हजार 630 मेट्रिक टन नियोजित केला असून प्रत्यक्ष
20 हजार 358 मॅट्रिक टन साठा उपलब्ध आहे. युरिया व डीएपी खतांच्या संरक्षित साठ्यामुळे शेतकऱ्यांना
मागणीनुसार खतांचा पुरवठा होईल असे कृषी सहसंचालक उमेश घाडगे यांनी यावेळी सांगितले.

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages