Type Here to Get Search Results !

Gramin Uday Logo

Gramin Uday Logo

अमरावती:; कुलरनंतर आता मोबाईल चार्जिंगने घेतला १६ वर्षीय मुलीचा जीव

जान्हवी किशोर सोनारे

दि. १५ वरुड:- 

अमरावती जिल्ह्यातील वरुड तालुक्यातील सुरळी येथे मोबाईल चार्जिंगवर लावताना लागलेल्या भीषण विजेच्या धक्क्याने (विद्युत शॉक) एका १६ वर्षीय विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही धक्कादायक घटना बुधवार, १३ मे २०२६ रोजी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास घडली.

मृत विद्यार्थिनी: जान्हवी किशोर सोनारे (वय १६ वर्षे, राहणार सुरळी, ता. वरुड, जि. अमरावती).

 जान्हवी अत्यंत हुशार मुलगी होती. तिने नुकतीच प्रथम श्रेणीत दहावीची परीक्षा उत्तीर्ण केली होती. सध्या तिची अकरावी प्रवेशासाठी धावपळ व तयारी सुरू होती.

 सोनारे दांपत्याला दोन मुली असून, जान्हवी ही त्यांची लहान मुलगी होती.

बुधवारी सायंकाळी घरात काम सुरू असताना, जान्हवी सायंकाळी साडेसहा वाजताच्या दरम्यान तिचा मोबाईल चार्जिंगला लावण्यासाठी बोर्डाच्या प्लगजवळ गेली.

प्लगमध्ये चार्जर लावत असताना तिला अचानक विजेचा अतिशय जोरदार धक्का (करंट) बसला. विजेच्या तीव्र धक्क्यामुळे तिची प्रकृती अत्यंत गंभीर झाली.

घटना घडताच तिच्या आई-वडिलांनी शेजाऱ्यांच्या मदतीने तिला तातडीने वरुड येथील एका खाजगी रुग्णालयात नेले.
परंतु, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच किंवा उपचारापूर्वीच तिची प्राणज्योत मालवली होती. डॉक्टरांनी तपासणी अंती तिला मृत घोषित केले.
डोळ्यांदेखत तरुण आणि हुशार लहान मुलीचा असा दुर्दैवी अंत झाल्याने सोनारे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेची माहिती मिळताच सुरळी संपूर्ण गावावर शोककळा पसरली असून परिसरातून मोठी हळहळ व्यक्त होत आहे.

Post a Comment

0 Comments