Type Here to Get Search Results !

Gramin Uday Logo

Gramin Uday Logo

गोंदिया शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची आधुनिक सुविधांसह कामे वेगात पूर्ण करण्यावर भर





        वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक

·         वाढीव खर्च मान्यतेसाठी प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश

 

मुंबईदि. २ :- गोंदिया येथील वैद्यकीय महाविद्यालयाच्या उभारणीसाठी खर्चाच्या वाढीव मान्यतेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे बैठक घेण्यात येणार असूनया दृष्टीने उच्चाधिकार समितीकडे प्रस्ताव सादर करण्यात यावाअसे निर्देश वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले.

             मंत्रालयात वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली. यावेळी खासदार प्रफुल्ल पटेलआमदार विनोद अग्रवालवैद्यकिय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव धीरज कुमार उपस्थित होते.

         वैद्यकीय शिक्षण मंत्री मुश्रीफ यावेळी म्हणालेराष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाच्या निकषानुसार वैद्यकीय महाविद्यालय संकुलासाठी राज्य शासनाकडून वित्तीय व प्रशासकीय मान्यता देण्यात आल्या आहेत. सद्य:स्थितीत प्रशासकीय कार्यालयाच्या मुख्य इमारतीसह विविध विभागांचे काम प्रगतीपथावर आहे यातील सुविधा अत्याधुनिक असाव्यात यादृष्टीने कार्यवाही केली जात आहेअसे मुश्रीफ यांनी सांगितले.

             खासदार प्रफुल्ल पटेल आणि आमदार विनोद अग्रवाल यांनी महाविद्यालयाची सुसज्जता आणि आधुनिकतेच्या दृष्टीने विविध सूचना केल्या. या वैद्यकीय महाविद्यालयाची कामे लवकर पूर्ण केली जावीतअसेही यावेळी सांगण्यात आले.

            यावेळी बैठकीत वैद्यकीय महाविद्यालयाच्या बांधकामाच्या प्रगतीचा आढावा सादर करण्यात आला. या संकुलाच्या उभारणीमध्ये मुख्य प्रशासकीय संकुलऑडिटोरियमॲनाटोमिक डिपार्टमेंटशल्य चिकित्सा गृहवॉर्ड अतिदक्षता विभागएनआयसीयू यासह विविध कामे सुरू आहेत. सद्यस्थितीत यासाठी ७९० कोटी रुपये खर्च अपेक्षित असून विविध सुविधा आणि शल्य चिकित्सा गृहाची संख्या वाढविण्याच्या दृष्टीने सादर झालेल्या प्रस्तावाच्या अनुषंगाने खर्चात वाढ होत आहे.


Tags

Post a Comment

0 Comments