Type Here to Get Search Results !

Gramin Uday Logo

Gramin Uday Logo

शिरजगाव कसबा येथील खुदानपूर हनुमान मंदिरात अज्ञात चोरट्यांचा दरोडा; दानपेटी तोडून रोकड लंपास!




 शिरजगाव कसबा दि. १५ :- (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क)

शिरजगाव कसबा येथील खुदानपूर हनुमान मंदिरात धाडसी चोरी झाली असून चोरट्यांनी दानपेटी फोडून रोख रक्कम लंपास केली आहे. या घटनेमुळे भाविकांमध्ये आणि परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे. 

याबाबत मिळालेल्या माहिती नुसार  शिरजगाव कसबा  दक्षिणेकडे  प्रसिद्ध खुदानपूर हनुमान मंदिर आहे.

 काल रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी मंदिरातील  सिमेंट-काँक्रीट  बांधकामात असलेली दानपेटी फोडून रक्कम लंपास केली आहे. याबाबत पोलिसांनी पुढील काय कार्यवाही केली आहे , ती माहिती मिळालेली नाही .

शिरजगाव कसबाच्या शेत शिवारामध्ये विहिरीतील केबल  चोरीचे अनेक प्रकार घडलेले आहे. यामुळे  शिरजगाव कसबा मध्ये पोलीस स्टेशन आहे की नाही ? असा येथील नागरिकांना प्रश्न पडला आहे.

धार्मिक स्थळावरील या चोरीच्या घटनेमुळे शिरजगाव कसबा परिसरातील नागरिकांनी सुरक्षा व्यवस्थेबाबत चिंता व्यक्त केली असून चोरट्यांना लवकरात लवकर अटक करण्याची मागणी केली आहे.

Post a Comment

0 Comments