Type Here to Get Search Results !

Gramin Uday Logo

Gramin Uday Logo

शिरोलीत हृदयद्रावक घटना;कूलरचा शॉक लागून १४ महिन्यांच्या चिमुकल्याचा मृत्यू

 


यवतमाळ दि. १५ :- (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क)

यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी तालुक्यात कूलरच्या लोखंडी स्टँडमध्ये विद्युत प्रवाह उतरल्याने एका १४ महिन्यांच्या बालकाचा शॉक लागून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही हृदयद्रावक घटना शिरोली येथे गुरुवारी (१४ मे २०२६) सकाळी सात वाजता घडली.

मृत बालक: स्वराज सूरज उले (वय १४ महिने, राहणार शिरोली).गुरुवारी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास घरातील दैनंदिन कामकाज सुरू असताना ही घटना घडली.

स्वराजचे वडील, काका आणि आजोबा नेहमीप्रमाणे सकाळीच गावातील त्यांच्या हॉटेलमध्ये कामासाठी गेले होते. घरात त्याची आजी आणि काकू इतर घरगुती कामात व्यस्त होत्या, तर त्याची आई घरासमोरील अंगणात सडा-सारवण करत होती.

घराच्या अंगणात एक कूलर सुरू करून ठेवलेला होता. हा कूलर सुरू असल्याने त्याच्या लोखंडी स्टँडमध्ये अचानक विद्युत प्रवाह (करंट) उतरला होता.

 आई अंगणात काम करत असताना चिमुकला स्वराज तिथे खेळत होता. खेळता-खेळता तो निरागसपणे कूलरजवळ पोहोचला आणि त्याने कूलरच्या लोखंडी स्टँडला हात लावला.

 हात लावताच त्याला विजेचा जोरदार धक्का बसला. घटना लक्षात येताच घरातील लोकांनी तात्काळ विद्युत प्रवाह बंद केला. स्वराजला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तपासणीअंती त्याला मृत घोषित केले.

या अत्यंत दुर्दैवी आणि हृदयद्रावक घटनेमुळे शिरोली संपूर्ण गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
Tags

Post a Comment

0 Comments