शिरजगाव गावातील मुख्य रस्त्यावरील वाहन समस्या व इतरही मुद्दे. - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Wednesday, May 13, 2026

शिरजगाव गावातील मुख्य रस्त्यावरील वाहन समस्या व इतरही मुद्दे.

अमन ठाणेदार लक्ष देईल का?

शिरजगाव कसबा ,दिनांक १४ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क)

पोलीस स्टेशन शिरजगाव कसबा महेंद्र गवई ठाणेदाराचे स्थानांतर नंतर अमन सिरसाट  ठाणेदार पदी रुजू झाले आहे. परंतु नवीन ठाणेदारांनी गावातील मुख्य रस्त्यावरील वाहन समस्या कडे लक्ष न दिल्याने सामान्य नागरिकांना त्रास होत आहे.

स्थानीक तेलीपुरा चौक, शिवाजी चौक ते गवत साथ चौक मुख्य रस्त्यावर वाहने उभी राहत असल्यामुळे महिलांना या चौकामधून जाणे अडचणीचे ठरत आहे. याच गवत साथ ,गुजरी बाजार चौकामध्ये काही वर्षा अगोदर क्षुल्लक कारणावरून जातीय दंगल झालेली आहे.

अमन साहेब दारू दुकानासमोरून तरुणांला पकडून पोलीस स्टेशनमध्ये बसून ठेवत आहे. अशी शिस्त गावातील वाहनधारकांना लावली तर---------.

पाळा रोड वरून एक दिवसाआड कनान रेतीचे मूलताई मार्गावरून आलेले ओव्हरलोड मोठे टिप्पर वाहतूक होत आहे. अवैध मुरूम वाहतूक होत आहे. याकडे ही पहावे......

अमन ठाणेदार साहेब पत्रकारांचा फोन घेत नाही...... राजकीय कार्यकर्त्यांना पोलीस स्टेशनला बसून वाट पाहायला लावतात.......... अशी कार्यकर्त्याची तक्रार आहे. शांतता समिती सदस्य सोबत साहेबांचा समन्वय नाही.........अशी कुजबुज आहे.

अमन ठाणेदार साहेब गावातील नागरिका करिता शिस्तप्रिय अमन ठाणेदार साहेब ठरावे अशी सर्वसामान्याची इच्छा आहे.

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages