'माझं गाव आरोग्य संपन्न गाव' अभियान: तालुका कृती समितीमध्ये अ. भा.ग्रा.पत्रकार संघाचे पुरुषोत्तम ऊर्फ नानाभाऊ इंगोले यांची सदस्य म्हणून निवड! - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Thursday, May 21, 2026

'माझं गाव आरोग्य संपन्न गाव' अभियान: तालुका कृती समितीमध्ये अ. भा.ग्रा.पत्रकार संघाचे पुरुषोत्तम ऊर्फ नानाभाऊ इंगोले यांची सदस्य म्हणून निवड!


 दिनांक २१ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क)

राज्यातील नागरिकांचे आरोग्यमान सुधारण्यासाठी राज्यभरात "माझं गाव आरोग्य संपन्न गाव" हे महत्त्वाकांक्षी अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाची तेल्हारा तालुक्यात प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी तालुका स्तरावर एक विशेष 'कृती समिती' स्थापन करण्यात आली आहे. या अधिकृत समितीमध्ये तालुक्याचे अभ्यासू पत्रकार नानाभाऊ (पुरुषोत्तम) इंगोले यांची सदस्य म्हणून महत्त्वपूर्ण नियुक्ती करण्यात आली आहे.
​तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय, तेल्हारा यांच्या वतीने जारी करण्यात आलेल्या अधिकृत पत्रानुसार या समितीची स्थापना करण्यात आली असून, या अभियानाला गती देण्यासाठी २७/०४/२०२६ रोजी पंचायत समिती तेल्हारा येथे एका विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
अशी आहे तालुका कृती समिती: 
​गटविकास अधिकारी अशोकराव बांगर यांच्या अध्यक्षतेखाली आणि वैद्यकीय अधीक्षक डॉ. मनोज पेंढाम यांच्या सह-अध्यक्षतेखाली या समितीचे गठन करण्यात आले आहे. वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र पंचगव्हान डॉ निलेश अंबरते सदस्य, वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र दानापूर डॉ आयशा असद शेख सदस्य,वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र हिवरखेड डॉ वैशाली ठाकरे सदस्य, वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र आडगाव डॉ वैष्णवी खेर्डे सदस्य, बालविकास प्रकल्प अधिकारी अमित रायबोले सदस्य, अभियंता पाणी पुरवठा विभाग अमोल चिरडे सदस्य, तालुका विस्तार अधिकारी एस.यु. ठोंबरे सदस्य, गट शिक्षणाधिकारी सुनीता बकाल सदस्य, पत्रकार प्रतिनिधी पुरुषोत्तम उर्फ नानाभाऊ इंगोले सदस्य (अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ), तालुका आरोग्य अधिकारी डॉ फरहान फारूक खान नसीर खान सदस्य असून तालुक्यातील आरोग्य यंत्रणा, बालविकास विभाग, पाणी पुरवठा विभाग आणि शिक्षण क्षेत्रातील प्रमुख अधिकाऱ्यांचा या समितीत समावेश आहे. या संपूर्ण समितीचे सदस्य सचिव म्हणून तालुका आरोग्य अधिकारी डॉ. फरहान फारुक खान नसीर खान हे काम पाहत आहेत.
​ लोकप्रतिनिधी आणि माध्यमांचे सहकार्य:
​अभियान तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि लोकजागृती करण्यासाठी समितीमध्ये पत्रकार संघाचे प्रतिनिधी म्हणून नानाभाऊ इंगोले यांची निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या नियुक्तीमुळे पत्रकार संघ तसेच तालुक्यातील सुजाण नागरिकांमधून आनंद व्यक्त होत असून, त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages