स्थानिक प्राधिकारी मतदारसंघांची निवडणूक उपविभागीय स्तरावर होणार - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Wednesday, May 20, 2026

स्थानिक प्राधिकारी मतदारसंघांची निवडणूक उपविभागीय स्तरावर होणार



*राजकीय पक्षांच्या बैठकीत जिल्हाधिकारी यांची माहिती

अमरावती, दि. २१ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क) : भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधान परिषदेच्या अमरावती स्थानिक प्राधिकारी मतदारसंघांसाठी निवडणूक जाहीर केली आहे. ही निवडणूक उपविभागीय अधिकारीस्तरावर होणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी आशिष येरेकर यांनी दिली.

स्थानिक प्राधिकारी मतदारसंघांच्या निवडणूक निमित्ताने जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसोबतच बैठक घेतली. बैठकीसाठी अतिरिक्त जिल्हाधिकारी गोविंदा दानेज आणि उपजिल्हा निवडणूक अधिकारी शिवाजी शिंदे उपस्थित होते.

बैठकीत स्थानिक प्राधिकारी मतदारसंघांसाठी जाहीर करण्यात आलेला कार्यक्रमाची माहिती देण्यात आली. तसेच निवडणूक काळात आदर्श आचारसंहिता राहणार असून त्याचे काटेकोरपणे पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या. उमेदवार, प्रचार करणारे व्यक्ती आणि निवडणुकीशी संबंधितांसाठी मार्गदर्शक सूचना आहेत, त्यानुसार कारवाई होणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले. मंत्री आणि लोक प्रतिनिधी यांच्यासाठी वाहनाचा वापर किंवा प्रचारासाठी नियम ठरवून देण्यात आले आहे. तसेच प्रचार साहित्य तपासून देण्यासाठी माध्यम प्रमाणन व संनियंत्रण समिती नेमण्यात आली असल्याचे सांगितले.

राजकीय पक्षांना मतदारांची ड्राफ्ट यादी देण्यात येणार असून यावर काही हरकती असल्यास त्या नोंदविण्यात याव्यात. सात दिवसानंतर या याद्यांना अंतिम स्वरूप देण्यात येणार असून याद्या मतदानकेंद्रनिहाय पुरविण्यात येतील, अशी माहिती जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी दिली. बैठकीला राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते.


Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages