Type Here to Get Search Results !

Gramin Uday Logo

Gramin Uday Logo

खल्लार पोलीस ठाण्यातील सहा बेवारस वाहनांचे क्रमांक जाहीर

 

 मालकांनी तातडीने संपर्क साधण्याचे पोलिसांचे आवाहन

अमरावती, दि.१४ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क) :  स्थानिक पोलीस ठाण्यात बेवारस (लावारिस) रजिस्टरमध्ये नोंद असलेल्या एकूण सहा वाहनांची यादी खल्लार पोलिस स्टेशन, अमरावती ग्रामीण यांनी जाहीर केली आहे. या वाहनांवर अद्यापपर्यंत कोणीही मालकी हक्क सांगितलेला नसल्याने, मूळ वाहन मालकांचा शोध घेण्यासाठी आणि या वाहनांची कायदेशीर विल्हेवाट लावण्यासाठी पोलिसांनी ही माहिती प्रसिद्ध केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या तपशिलानुसार, जप्त केलेल्या वाहनांमध्ये टीव्हीएस कंपनीची दुचाकी (वाहन क्रमांक MH 27 AE 0207, हिरो पॅशन प्रो (वाहन क्रमांक MH 27 AY 5134), बजाज पल्सर (वाहन क्रमांक MH 31 BX 1729),  हिरो होंडा (वाहन क्रमांक MH 30 G 1014), ऑटो रिक्षा (वाहन क्रमांक MH 30 P 8956) आणि एक चारचाकी लोडिंग वाहनाचा (वाहन क्रमांक MH 27 AX 54) समावेश आहे.

सदर वाहने ज्यांच्या मालकीची आहेत किंवा ज्या नागरिकांची या क्रमांकाची वाहने चोरीला गेली आहेत, त्यांनी आपल्या वाहनांची मूळ कागदपत्रे आणि योग्य कायदेशीर पुराव्यांसह तातडीने खल्लार पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा. विहित मुदतीत कोणीही हक्क न सांगितल्यास, या सर्व बेवारस वाहनांची कायदेशीर प्रक्रियेचा अवलंब करून विल्हेवाट लावली जाईल, असे पोलीस प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

                                                                             ****

Post a Comment

0 Comments