Type Here to Get Search Results !

Gramin Uday Logo

Gramin Uday Logo

अमरावतीत 19 मे रोजी 'पं. दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा

 

अमरावती, दि.१४ (ग्रामीण उदय  न्यूज नेटवर्क) :  सुशिक्षित युवक-युवतींना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र तथा मॉडेल करिअर सेंटर, अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार, दिनांक 19 मे 2026 रोजी 'पं. दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे' आयोजन करण्यात आले आहे. हा मेळावा शासकीय तांत्रिक विद्यालय परिसर, डेपो रोड, अमरावती येथे आयोजित करण्यात आला आहे.

या मेळाव्यामध्ये नागपूर आणि अमरावती येथील नामांकित कंपन्या प्रत्यक्ष सहभागी होणार आहेत. यामध्ये प्रामुख्याने टॅलेन्टकॉर्प सोल्यूशन प्रा.लि. नागपूर, जाधव गियर्स लि. अमरावती, जिनस इन्फ्रास्ट्रक्चर लि. अमरावती आणि प्रेसिजन मॅपिंग जी.आय.एस. प्रा.लि. अमरावती या कंपन्यांचा समावेश आहे. या कंपन्यांमधील विविध रिक्त पदांसाठी त्या-त्या शैक्षणिक पात्रतेनुसार कंपन्यांचे प्रतिनिधी उमेदवारांच्या थेट मुलाखती घेतील आणि पात्र उमेदवारांची जागेवरच नोकरीसाठी निवड केली जाईल.

अमरावती जिल्ह्यातील जास्तीत जास्त युवक-युवतींना रोजगार मिळवून देणे हा या मेळाव्याचा मुख्य उद्देश आहे. इच्छुक उमेदवारांनी 19 मे रोजी स्वखर्चाने आवश्यक शैक्षणिक कागदपत्रे, बायोडाटा आणि पासपोर्ट आकाराच्या फोटोंसह मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. याकरिता उमेदवारांना कोणताही प्रवास भत्ता देय असणार नाही.

मेळाव्याबाबत काही अडचण असल्यास उमेदवारांनी कार्यालयाच्या 0721-2566066, 8983419799 किंवा 8605654025 या क्रमांकावर किंवा amravatirojgar@gmail.com या ईमेलवर संपर्क साधावा. जिल्ह्यातील गरजू आणि पात्र उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त यांनी केले आहे.

                                                                     *****

Post a Comment

0 Comments