Type Here to Get Search Results !

Gramin Uday Logo

Gramin Uday Logo

महाराष्ट्र राज्य वर्धापन दिनाच्या मुख्य शासकीय समारंभाची रंगीत तालीम






 

मुंबईदि. १ : महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ६७ व्या वर्धापन दिनानिमित्त दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर आज शुक्रवार,  १ मे २०२६ रोजी मुख्य शासकीय समारंभ आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाची रंगीत तालीम याच मैदानावर घेण्यात आली. यावेळी ध्वजवंदन राजशिष्टाचार विभागाचे उपसचिव चंद्रकांत मोरे  यांनी केले. राष्ट्रीय गीतराष्ट्रगीत आणि राज्यगीताने  ध्वजाला सलामी देण्यात आली.

शासनाच्या सामान्य प्रशासन विभाग (राजशिष्टाचार) यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. याप्रसंगी गृह विभागाचे अपर पोलीस महासंचालक (प्रशासन) मधुकर पांडे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

या कार्यक्रमात २६ जानेवारी २०२६ रोजी झालेल्या प्रजासत्ताक दिन समारोहात उत्कृष्ट संचलन केलेल्या पथकांना अपर पोलीस महासंचालक मधुकर पांडे यांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करण्यात आली. यामध्ये सशस्त्र दलनि:शस्त्र दल आणि शालेय पथकास पारितोषिक देण्यात आले. सशस्त्र दलांमध्ये प्रथम पारितोषिक राज्य राखीव पोलीस पथक,  द्वितीय पारितोषिक बृहन्मुंबई पोलीस सशस्त्र पुरुष पथक आणि तृतीय पारितोषिक संयुक्तपणे बृहन्मुंबई दंगल नियंत्रण पथकगोंदिया व गडचिरोली जिल्ह्याचे सी ६० पथक यांनी पटकाविला. निःशस्त्र दलांमध्ये प्रथम पुरस्कार मुंबई अग्निशमन दलद्वितीय पुरस्कार सुरक्षा रक्षक मंडळ बृहन्मुंबई आणि ठाणे जिल्हा,  तृतीय क्रमांक राज्य उत्पादन शुल्क यांनी पटकाविला.

            या संचलनामध्ये शालेय पथके सहभागी झाली होती. शालेय पथकांमध्ये  प्रथम पुरस्कार रोड सेफ्टी पेट्रोल मुलींच्या रुस्तमजी इंटरनॅशनल स्कूलदहिसर यांच्या पथकासद्वितीय पुरस्कार रोड सेफ्टी पेट्रोल मुलांच्या डॉ. ॲन्टोनियो डा सिल्वा हायस्कूलदादर यांच्या पथकास  आणि तृतीय पुरस्कार रोड सेफ्टी पेट्रोल मुले सेंट पॉल हायस्कूलदादर यांच्या पथकाने पटकाविला.

याशिवाय केंद्र शासनाच्या गृह मंत्रालयाच्या वतीने शासकीय शाळांमधील आठवी आणि नववीच्या विद्यार्थ्यांना सशस्त्र पोलीस दलाच्या आधुनिकीकरण अंतर्गत स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम राबविण्यात येत आहे. यामध्ये शासकीय व बृहन्मुंबई महापालिकेच्या २४४ शाळांमध्ये हा कार्यक्रम प्रभावीपणे राबविला जात आहे.२०२५ - २६ या शैक्षणिक वर्षामध्ये पोलीस कॅडेट प्रोग्रॅम अंतर्गत उल्लेखनीय कामगिरी केलेल्या शाळांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. यामध्ये  प्रथम पुरस्कार  मराठी मुंबई पब्लिक स्कूलविलेपार्ले (पश्चिम)द्वितीय पुरस्कार एस.एस.एस मल्टीपर्पज टेक्निकल हायस्कूल मुंबई आणि तृतीय पुरस्कार  अंजुमन आय इस्लाम बद्रुद्दिन तैयबजी हायस्कूल मुंबई यांनी पटकाविला.

यानंतर राज्य राखीव पोलीस दलबृहन्मुंबई सशस्त्र पोलीस दलबृहन्मुंबई दंगल नियंत्रण पथकबृहन्मुंबई सशस्त्र महिला पोलीस दलनिशाण टोळी (महाराष्ट्र पोलीस ध्वजबृहन्मुंबई पोलीस ध्वजराज्य राखीव पोलीस बल ध्वजमहाराष्ट्र अग्निशमन सेवा संचालनालय ध्वजबृहन्मुंबई अग्निशमन दल ध्वजगृहरक्षक दल ध्वज)मुंबई लोहमार्ग पोलीस दलमुंबईत पुरुष पोलीस दलबृहन्मुंबई वाहतूक पोलीस दलगृहरक्षक दल महिला पथकमुंबई अग्निशमन दल,मुंबई महापालिका सुरक्षा रक्षक दलसुरक्षा सुरक्षा मंडळ दल मुंबई आणि ठाणे जिल्हापाईप बँड पथकबृहन्मुंबई पोलिस महिला पाईप बँड पथकब्रास बँड पथकअश्व दल पोलीस पथकमहिला निर्भया पथक यांनी मानवंदना दिली. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवानी जोशी आणि पल्लवी मुजुमदार  यांनी केले.

                          


Post a Comment

0 Comments