विदर्भावर नवतपाचे संकट: तापमान ४८ अंशांच्या पार जाण्याची भीती! - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Thursday, May 21, 2026

विदर्भावर नवतपाचे संकट: तापमान ४८ अंशांच्या पार जाण्याची भीती!


नागपूर दि. २२ :-
 २५ मे पासून सूर्य आग ओकणार असून नवतपाच्या नऊ दिवसांत संपूर्ण विदर्भाची कसोटी लागणार आहे.
या काळात विदर्भाचे तापमान तब्बल ४८ अंश सेल्सिअसच्या पार जाण्याची शक्यता आहे.
 ३० ते ३९ मे दरम्यान या प्रचंड उष्णतेसोबतच वादळी वारे वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
 नवतपाच्या ९ दिवसांत सूर्य वृषभ राशीत ९ ते १७ अंशांवरून भ्रमण करेल. खगोलशास्त्र आणि ज्योतिषशास्त्रानुसार या काळात सूर्याचे पृथ्वीवरील अंतर सर्वात कमी असते. सूर्याची किरणे थेट पृथ्वीवर पडल्यामुळे असह्य उकाडा आणि उष्णता वाढते.
ज्योतिषीय गणनेनुसार २५ मे रोजी दुपारी ३:२९ वाजता सूर्य 'रोहिणी' नक्षत्रात 'हत्ती' या वाहनावरून प्रवेश करेल. हत्ती हे वाहन प्रचंड उष्णतेचे प्रतीक मानले जाते.
 या प्रवेशाच्या वेळी शनी वगळता एकही ग्रह जलराशीत नसल्यामुळे वातावरणातील कोरडेपणा कमालीचा वाढेल. सूर्याच्या सरळ किरणांमुळे विदर्भ 'ब्लास्ट फर्नेस'सारखा तापेल.
विदर्भच का तापतोय? 
 अरबी समुद्राकडून येणाऱ्या आर्द्रतेचे प्रमाण घटले आहे.
राजस्थानच्या वाळवंटाकडून येणारे कोरडे आणि उष्ण वारे थेट विदर्भावर आदळत आहेत.
 'अल् निनो'चा उत्तरार्ध, वेगवान काँक्रीटीकरण आणि जंगलतोड यांमुळे नागपूर, चंद्रपूर आणि अकोला या जिल्ह्यांनी महिन्याच्या सुरुवातीलाच ४५ अंशांचा टप्पा ओलांडला आहे.
२० जूननंतरच सुटकेचा नि:श्वास 
८ जून रोजी सूर्य 'मृग' नक्षत्रात प्रवेश करेल आणि शुक्र कर्क या जलराशीत जात असल्याने कोकणात मान्सून दाखल होईल.
मात्र, विदर्भाची प्रतीक्षा लांबणार आहे. नागपूर आणि परिसरात २० जूननंतरच मान्सूनचे आगमन होईल. तोपर्यंत विदर्भाला या गरमागरम नवतपाचा सामना करावा लागणार आहे.

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages