Type Here to Get Search Results !

Gramin Uday Logo

Gramin Uday Logo

माताफैल (बडनेरा) येथे महात्मा फुले जयंतीनिमित्त जनजागृती प्रदर्शनी, चवदार तळे सत्याग्रह पत्रक वाटप कार्यक्रम उत्साहात संपन्न







बडनेरा, दि. १३ एप्रिल २०२६ :
माताफैल, जुनी वस्ती (बडनेरा) येथे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, बडनेरा शहर शाखा यांच्या वतीने महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त मार्गदर्शन सभा, जनजागृती प्रदर्शनी तसेच चवदार तळे सत्याग्रह पत्रक वाटप कार्यक्रम उत्साहात पार पडला. समाजमंदिर येथे आयोजित या कार्यक्रमाला महिलांची लक्षणीय उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्ते तथा आंबेडकर विचारांचे विद्यार्थी मा. महादेव मेश्राम होते. प्रास्ताविक मा. दिलीप लाडे यांनी केले. प्रमुख मार्गदर्शक म्हणून मा. विजय डवरे (जिल्हा प्रधानसचिव, महा. अनिस, अमरावती) यांनी महिलांनी अंधश्रद्धेला बळी न पडता फुले-शाहू-आंबेडकर विचार स्वीकारून विज्ञाननिष्ठ व विवेकशील राहण्याचे आवाहन केले. तसेच मा. विजया घोडेस्वार यांनी महिलांनी गावागावात संघटन उभे करून शाखा सुरू करण्याची गरज अधोरेखित केली.
यावेळी मा. प्रफुल मंदा यांनी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्याचा आढावा घेत महिलांनी भविष्यात सक्रिय भूमिका बजावावी, असे मार्गदर्शन केले. कार्यक्रमात विविध मान्यवरांनी मनोगत व्यक्त करत सामाजिक परिवर्तनाचा संदेश दिला.
प्रमुख उपस्थिती म्हणून सरिता लाडे (सदस्य, अमरावती शहर वस्तीस्तर संघ), नूतन वासनिक (महा. अनिस, बडनेरा शहर), रेहमत शहा (अध्यक्ष, महा. अनिस, बडनेरा शहर) यांची उपस्थिती लाभली.
कार्यक्रमादरम्यान महात्मा फुले, समता चळवळ, अंधश्रद्धा निर्मूलन आणि संविधान मूल्यांवर आधारित जनजागृती प्रदर्शनी लावण्यात आली होती. तसेच चवदार तळे सत्याग्रहाविषयी पत्रकांचे वाटप करून जनजागृती करण्यात आली. या उपक्रमांनी उपस्थितांचे विशेष लक्ष वेधून घेतले.
कार्यक्रमाला उमा इंगोले, रमा मोहोड, वाघमारे ताई, कुमुद मेश्राम, मोनाली तायडे, जयश्री गवळी, सुरेखा तायडे, वृंदा आगलावे, मनाली श्रीवास्तव, राणी बागडे, स्मिता सुखदेवे, सीमा काळे, नीता इंगळे, सरिता इंगळे, किरण ताई वाघमारे, सारिका राहुल, किरण ताई दुपारे, रंजना भजगवरे, सोनाली इंगळे, माधुरी वानखडे, सुनिता वानखडे, अर्चना कैथ्वास आदींसह शहरातील अनेक महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैशाली राऊळ यांनी केले, तर आभार प्रदर्शन अनुपमा गोंडाने (अध्यक्ष, संकल्प वस्तीस्तर संघ) यांनी केले.
या कार्यक्रमासाठी संविधान जागर अभियान, महिला बचत गटांचे संकल्प, सावित्री, लोकसेवा, जनसेवा, बुद्धछाया वस्तीस्तर संघ तसेच क्रांती नवनिर्मिती राष्ट्रीय संघटन यांचे सहकार्य लाभले. “समता, विज्ञाननिष्ठा आणि संविधान” या मूल्यांचा प्रभावी संदेश देणारा हा कार्यक्रम समाजप्रबोधनासाठी महत्त्वपूर्ण ठरला.
कार्यक्रमानंतर भोंदू खरात यांच्या निषेधार्थ डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, माताफैल (बडनेरा) येथे निषेध आंदोलन करण्यात आले.

Tags

Post a Comment

0 Comments