संघटन बळकटीसाठी संस्था व्यवस्थापन कार्यशाळा मार्गदर्शक ठरली — सुजाता गणेश अध्यक्ष वसुंधरा शहरस्तर संघ. - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Thursday, April 23, 2026

संघटन बळकटीसाठी संस्था व्यवस्थापन कार्यशाळा मार्गदर्शक ठरली — सुजाता गणेश अध्यक्ष वसुंधरा शहरस्तर संघ.


बडनेरा, दि. २४ एप्रिल २०२६  :
नवी वस्ती, बडनेरा येथील सिद्धार्थ बुद्ध विहार येथे DAY-NULM अंतर्गत आयोजित संस्था व्यवस्थापन कार्यशाळा उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरित्या संपन्न झाली.
या कार्यशाळेला वसुंधरा शहरस्तर संघ, अमरावती यांच्या अध्यक्षा मा. सुजाताताई गणेश यांच्या अध्यक्षतेखाली मार्गदर्शन लाभले. शहर अभियान व्यवस्थापक मा. श्री. भूषण बाळे व मा. श्री. प्रफुल ठाकरे यांनी संस्थेचे प्रभावी व्यवस्थापन, संघटन कौशल्य, आर्थिक शिस्त तसेच विविध शासकीय योजनांचा लाभ कसा घ्यावा यावर सखोल मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून अमरावती शहरस्तर संघाच्या सचिव मा. वैशाली धुळधर उपस्थित होत्या. समुदाय संघटक मा. प्रफुल्ल कुकडे व मा. रेणुका कापुसकर यांनी कार्यशाळेचे नियोजन व समन्वय उत्तम प्रकारे पार पाडत सहभागी महिलांना प्रत्यक्ष अनुभवाधारित मार्गदर्शन केले.
या कार्यशाळेत आदर्श, संघिणी, जनसेवा, लोकसेवा, नवनिर्माण, बुद्धछाया, आधार, सौमित्र, सावित्री, संकल्प, नारीशक्ती, संविधान, सहेली आदी विविध वस्तीस्तर संघांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहिले. प्रत्येक संघातून महिला सदस्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून प्रशिक्षणाचा लाभ घेतला.
तसेच समुदाय संसाधन व्यक्ती (CRP) म्हणून किरण दुपारे, जयश्री गडेकर, योगिता वडुरकर, रुपाली हजारे, कुंदा मेश्राम, वंदना पवार, मनाली इंगळे, मोनाली सदावर्ते, मेघा ओगले, प्राजक्ता गोबरे, उमा इंगोले, रमा मोहोड यांनी सक्रिय सहभाग नोंदविला.
कार्यशाळेत संघ नोंदणी प्रक्रिया, बैठकींचे प्रभावी नियोजन, लेखा व्यवस्थापन, बचत गटांचे सशक्तीकरण, तसेच संघांच्या माध्यमातून उपजीविका व स्वावलंबनाच्या संधी निर्माण करण्यावर विशेष भर देण्यात आला. सहभागी महिलांनी आपल्या अडचणी मांडून त्यावर मार्गदर्शकांकडून समाधानकारक उत्तरे मिळवली.
यावेळी अध्यक्ष मा. सुजाताताई गणेश यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, “महिलांचे सशक्तीकरण सक्षम व संघटित संस्थांमधूनच साध्य होऊ शकते. वस्तीस्तर संघांनी एकजुटीने कार्य केल्यास समाजात सकारात्मक बदल घडवता येतो. अशा कार्यशाळा महिलांमध्ये नेतृत्वगुण विकसित करण्यास व आत्मविश्वास वाढविण्यास महत्त्वाची भूमिका बजावतात.”
कार्यशाळेचे प्रास्ताविक प्राजक्ता गोबरे यांनी केले, संचालन उमा इंगोले यांनी प्रभावीपणे पार पाडले, तर आभारप्रदर्शन किरण दुपारे यांनी केले. कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यासाठी किरण दुपारे व जयश्री गडेकर यांनी विशेष परिश्रम घेतले.
यावेळी भविष्यात अधिक सखोल व विस्तृत प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला असून, महिलांना सक्षम, स्वावलंबी व संघटित करण्यासाठी सर्व वस्तीस्तर संघांनी एकत्रितपणे कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला.

हा कार्यक्रम सर्व वस्तीस्तर संघ, बडनेरा व वसुंधरा तसेच अमरावती शहरस्तर संघ यांच्या वतीने आयोजित करण्यात आला. 

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages