Type Here to Get Search Results !

Gramin Uday Logo

Gramin Uday Logo

औष्णिक विद्युत केंद्रांना सांडपाणी वापराचा ऊर्जा राज्यमंत्री यांच्याकडून आढावा


 


मुंबईदि.२० : एसटीपी प्रकल्प उभारून महानिर्मिती अंतर्गत भुसावळ व पारस औष्णिक विद्युत केंद्रांना नजीकच्या महानगरपालिकागरपालिकेकडील सांडपाणी वापरणे याबाबतचा आढावा ऊर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी आज घेतला.

 

एमएसईबी होल्डिंग कंपनी कार्यालयात झालेल्या या बैठकीस संचालक अभय हरणेकोराडी औष्णिक विद्युत केंद्राचे उपमुख्य अभियंता शिरीष वाठ यांच्यासह महापालिका आयुक्त जळगावअकोला तसेच नगरपरिषद भुसावळ व नगरपरिषद शेगावचे अधिकारी बैठकीस उपस्थित होते.

 

ऊर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर म्हणाल्याऔष्णिक विद्युत केंद्रांना आवश्यक पाणी उपलब्ध व्हावे यासाठी एसटीपी प्रकल्प उभारून नगरपालिकामहानगरपालिका क्षेत्रातील सांडपाणी वापरल्यास सांडपाण्याचे योग्य व्यवस्थापन होऊन जलप्रदूषणात घट होण्यास मदत होईल आणि या औष्णिक केंद्राला आवश्यक पाणीपुरवठाही उपलब्ध होईल.

 

 शेगाव शहराचे ८ एमएलडी पाणी औष्णिक विद्युत केंद्रासाठी घेण्याबाबतही मुख्याधिकारी नगरपरिषद शेगाव यांनी विनंती केली होती त्या अनुषंगाने ऊर्जा विभागाच्या अधिकाऱ्यांना  राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी याविषयी तांत्रिक व्यवहार्यता तपासणी करण्याच्या सूचना केल्या.

 

कोराडी औष्णिक विद्युत केंद्रासाठी ११० एमएलडीचा प्रकल्प हा नवीन प्रकल्प असून नागपूर शहरातील सांडपाण्यावर हा प्रकल्प चालविण्यात येणार आहे. भुसावळ येथील प्रकल्पासाठी जळगाव व भुसावळ शहरातील १०० एमएलडी सांडपाणी आणि  पारस विद्युत केंद्रासाठी २५ एमएलडी पाणी अकोला शहरातील सांडपाणी वापरले जाणार असल्याचे बैठकीत सांगण्यात आले.


Tags

Post a Comment

0 Comments