Type Here to Get Search Results !

Gramin Uday Logo

Gramin Uday Logo

वसई–विरार महापालिका क्षेत्रातील वीज समस्यांवर उपाययोजना करा - राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर




 

मुंबईदि. २० : वसईविरार महानगरपालिका क्षेत्रातील वीज समस्यांबाबत लोकप्रतिनिधींनी मांडलेल्या मुद्द्यांवर सकारात्मक निर्णय घेऊन तातडीने कार्यवाही करावी. तत्काळ पूर्ण होऊ शकणारी कामे मार्गी लावावीत. तसेच मोठ्या प्रकल्पांच्या कामांची टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी करावीअशा  सूचना ऊर्जासार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याणपाणीपुरवठा व स्वच्छता  राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांनी दिल्या.

एमएसईबी होल्डिंग कंपनीच्या सभागृहात आयोजित वसईविरार मनपा क्षेत्रातील वीज समस्यांच्या आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. बैठकीस आमदार राजन नाईकआमदार स्नेहा दुबेआमदार विलास तरे ( दूरदृश्य प्रणालीद्वारे)  महापारेषणचे संचालक सतीश चव्हाणमहावितरणचे संयुक्त व्यवस्थापकीय संचालक दिलीप जगदाळेतसेच महानिर्मितीमहापारेषणमहावितरणचे संबंधित अधिकारी आणि वसईविरार महानगरपालिकेचे लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर म्हणाल्यावसई विरार परिसरात सुरू असलेल्या विद्युत विषयक कामातील त्रुटीबाबत संबंधितांवर जबाबदारी निश्चित करून  त्यांच्यावर कारवाई करावी. तसेच फ्लाइंग स्क्वॉडचा प्रभावी वापर करून  याबाबतचा सविस्तर अहवाल सादर करावाअसे निर्देशही त्यांनी दिले.

बैठकीत आमदार राजन नाईकस्नेहा दुबे  यांनीही वसई विरार भागातील वीज समस्यांबाबत माहिती दिली.


Tags

Post a Comment

0 Comments