तहसीलदारांच्या नेतृत्वात मोठी कारवाई
शिरजगाव कसबा दिनांक २६ ( ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क):
अवैध रेती उत्खनन आणि वाहतुकीविरोधात प्रशासनाने आपला आक्रमक पवित्रा कायम ठेवला असून, दि. २६ मार्च २०२६ रोजी पहाटे चांदूर बाजार-मोर्शी मार्गावर महसूल विभागाने धडक कारवाई केली आहे .
उपविभागीय अधिकारी अचलपूर बळवंत अरखराव यांच्या मार्गदर्शनाखाली आणि तहसीलदार सोनल सूर्यवंशी यांच्या थेट नेतृत्वात महसूल पथकाने कन्हान रेतीची अवैध वाहतूक करणारे दोन मोठे टाटा ट्रक जप्त केले आहे.
पहाटे ५ वाजता महसूल पथकाचा 'ट्रॅप' मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे, महसूल विभागाने गुरुवारी सकाळी ५ वाजेच्या सुमारास चांदूर बाजार-मोर्शी रोडवर सापळा रचला होता. यावेळी टाटा कंपनीचे दोन संशयास्पद ट्रक अडवण्यात आले. कागदपत्रांची तपासणी केली असता, त्यामध्ये कोणत्याही अधिकृत रॉयल्टीशिवाय 'कन्हान'ची रेती भरलेली आढळली आहे .पथकाने तत्काळ दोन्ही ट्रक जप्त करून तहसील कार्यालय परिसरात लावले आहे.
या मोहिमेत महसूल विभागाच्या संपूर्ण चमूने सक्रिय सहभाग घेतला. यामध्ये प्रामुख्याने:
सोनल सूर्यवंशी ( तहसीलदार)
सुमित सोनवणे (महसूल अधिकारी)
प्रफुल्ल डवरे (ग्राम महसूल अधिकारी)
निवृत्ती गोरक्षे (ग्राम महसूल अधिकारी)
विश्वजीत बंगरे (ग्राम महसूल अधिकारी)
या सर्वांच्या सतर्कतेमुळे ही मोठी कारवाई यशस्वी झाली आहे.
रेती तस्करांचे धाबे दणाणले
कन्हान नदीच्या उच्च दर्जाच्या रेतीला मोठी मागणी असल्याने चोरट्या मार्गाने तिची वाहतूक करण्याचे प्रमाण वाढले होते. मात्र, आजच्या या धडक कारवाईमुळे तालुक्यातील रेती माफियांचे धाबे दणाणले तालुक्यात अवैध उत्खनन व रेती वाहतूक करणाऱ्यांवर अशीच सातत्यपूर्ण कार्यवाही केल्या जाईल असा इशारा तहसीलदार सोनल सूर्यवंशी यांनी दिला आहे.
Post a Comment
0 Comments