Type Here to Get Search Results !

Gramin Uday Logo

Gramin Uday Logo

गुरुकुंज मोझरी येथे 'मेरा युवा भारत' तर्फे शहीद दिन साजरा

 






अमरावती, दि. 24 (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क): 
भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील क्रांतीवीर भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांच्या बलिदानाच्या स्मृतीनिमित्त 'मेरा युवा भारत' तर्फे आज गुरुकुंज मोझरी येथे 'शहीद दिन' उत्साहात साजरा करण्यात आला.

 भारत सरकारच्या युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालयांतर्गत असलेल्या 'मेरा युवा भारत' अमरावती कार्यालयाच्या वतीने श्रीगुरुदेव अध्यात्म केंद्र, गुरुकुंज मोझरी येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करून शहिदांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या प्रसंगी विद्यार्थ्यांनी परिसरात स्वच्छता अभियान राबवून स्वच्छतेचा संदेश दिला, तसेच ­‘भगतसिंग अमर रहे’ अशा घोषणा देत पदयात्रा काढली.

या कार्यक्रमाप्रसंगी श्रीगुरुदेव अध्यात्म केंद्र गुरुकुलचे संचालक रविदादा मानव यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना संबोधित केले, तर प्रास्ताविक प्रा. अंकुश मानकर यांनी केले. शहीद दिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांनी भाषणे दिली.  विद्यार्थ्यांनी वीर शहिदांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करून श्रद्धांजली अर्पण केली.


Post a Comment

0 Comments