*पशूसंवर्धन विभागाचे आवाहन
अमरावती, दि. २१ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क) : जिल्हा प्राणी क्लेश प्रतिबंधक समिती अंतर्गत अशासकीय सदस्यांचा तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाला आहे. त्यामुळे रिक्त पदांवर नवीन सदस्यांची निवड करण्यासाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. यासाठी दि. 2 एप्रिलपूर्वी अर्ज सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
समितीच्या तरतुदीनुसार आणि नियम 2001 मधील निकषांनुसार, प्राणी क्लेश व्यवस्थापकीय समितीवरील सदस्य, गौशाळा किंवा पांजरापोळ संस्थेचे अध्यक्ष, प्राणी विषयावर कार्य करणाऱ्या सेवाभावी संस्थेचे सदस्य, सर्वसाधारण समितीने नामनिर्देशित केलेल्या व्यक्ती, मानवहित किंवा प्राणीमात्रांवर प्रेम करणाऱ्या क्षेत्रात कार्यरत व्यक्ती अशासकीय सदस्यत्वासाठी अर्ज करू शकतील.
इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज 2 एप्रिलपर्यंत कार्यालयीन वेळेत सादर करणे आवश्यक आहे. सदर अर्ज जिल्हा उपायुक्त, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय तथा सदस्य सचिव, जिल्हा प्राणी क्लेश प्रतिबंधक समिती, अमरावती या ठिकाणी स्विकारण्यात येतील. जिल्ह्यातील प्राणी कल्याण क्षेत्रात कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांनी अर्ज करावेत, असे आवाहन पशूसंवर्धन व दुग्धव्यवसाय जिल्हा उपायुक्त डॉ. एस. एम. कावरे यांनी केले आहे.
Post a Comment
0 Comments