Type Here to Get Search Results !

Gramin Uday Logo

Gramin Uday Logo

कौशल्य विकास केंद्राचा मंगळवारी टीसीएस प्लेसमेंट ड्राईव्ह



अमरावती, दि. २१ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क) : सुशिक्षित बेरोजगारांसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मोहिमेंतर्गत रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या स्वामी विवेकानंद विद्यार्थी भवनात मंगळवार, दि. 24 मार्च रोजी सकाळी 10 वाजता हा मेळावा होणार आहे.

या मेळाव्यामध्ये टाटा कंसल्टंसी सर्व्हीसेस या नामांकित आयटी कंपनीमार्फत बीपीएस पदासाठी भरती प्रक्रीया राबविण्यात येणार आहे. सदर भरती प्रक्रियेसाठी वयोमर्यादा 18 ते 28 वर्षे असून शैक्षणिक पात्रता बीए, बीकॉम, बीबीए, बीसीसीए, बीव्हीओसी, बीएससी जनरल आहे. यात 2023 आणि 2024 यावर्षात उत्तीर्ण, तसेच एमए, एमकॉम 2024 आणि 2025 उत्तीर्ण पात्रता निकष राहणार आहे.

निवड प्रक्रिया ही कागदपत्र पडताळणी, योग्यता परीक्षा, प्रत्यक्ष मुलाखतीतून होणार आहे. नोंदणीसाठी surl.li/lxxjb लिंक वरूनही नोंदणी करता येणार आहे. अधिक महितीसाठी विभागीय रोजगार मेळावा कक्ष प्रमुख अजय चव्हाण (8983419799) तसेच विभागीय कौशल्य विकास सहायक अक्षय डोईजड (7972755787) यांच्याशी संपर्क साधावा.

रोजगार मेळाव्यात उमेदवारांनी सहभागी होऊन टाटा कंसल्टंसी सर्व्हीसेस या कंपनीमध्ये नोकरी मिळविण्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठच्या विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. राजीव बोरकर, विभागीय उप आयुक्त द. ल. ठाकरे, कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त प्रांजली बारस्कर यांनी केले आहे.


--

Post a Comment

0 Comments