Type Here to Get Search Results !

Gramin Uday Logo

Gramin Uday Logo

दिव्यांग लाभार्थ्यांनी 25 मार्चपर्यंत दिव्यांग कार्ड जमा करावे*जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन




अमरावती, दि. २१  (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क) : संजय गांधी निराधार योजनेंतर्गत दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ करण्यात आली आहे. आता लाभार्थ्यांना दरमहा अडीच हजार रुपये अनुदान थेट लाभ हस्तांतरणाद्वारे देण्यात येत आहे. या प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी सर्व दिव्यांग लाभार्थ्यांनी त्यांचे ऑनलाईन यूडीआयडी कार्ड म्हणजेच दिव्यांग प्रमाणपत्र अपडेट करणे अनिवार्य करण्यात आले आहे. त्यामुळे लाभार्थ्यांनी 25 मार्चपर्यंत दिव्यांग प्रमाणपत्र जमा करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

ज्या लाभार्थ्यांकडे अद्याप ऑनलाईन यूडीआयडी कार्ड नाही, त्यांनी जिल्हा सामान्य रुग्णालय येथे जाऊन ते प्राप्त करून घ्यावे. जिल्हा सामान्य रुग्णालयात दररोज सकाळी 9 ते दुपारी 2 या वेळेत ऑनलाईन प्रमाणपत्र वितरणाचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी आरोग्य विभागाला दिले आहेत. लाभार्थ्यांनी आपले यूडीआयडी कार्ड आधार क्रमांकाशी लिंक करणे आवश्यक आहे.

लाभार्थ्यांनी कार्डची झेरॉक्स प्रत गावातील तलाठी किंवा तहसील कार्यालयातील संजय गांधी योजना विभाग येथे दि. 25 मार्च 2026 पूर्वी जमा करणे आवश्यक आहे, असे निवासी उपजिल्हाधिकारी संतोष काकडे यांनी कळविले आहे.


Post a Comment

0 Comments