"सावधान! बांगलादेशी मजूर ठेवणाऱ्या मालकांवर होणार कायदेशीर कारवाई"
दि. १४ :-(ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क):- महाराष्ट्र सरकारने बेकायदेशीर बांगलादेशी स्थलांतरितांविरुद्ध पुकारलेल्या मोहिमेबद्दल हि बातमी आहे.
गृह विभागाने नुकताच एक शासन निर्णय (GR) आणि परिपत्रक जारी केले असून, त्यानुसार आता अवैध बांगलादेशी नागरिकांना कामावर ठेवणारे किंवा त्यांना आश्रय देणारे थेट कायदेशीर कारवाईच्या कचाट्यात येणार आहेत .
मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात जे बिल्डर, व्यापारी किंवा उद्योगपती स्वस्त मजुरांच्या हव्यासापोटी अवैध बांगलादेशी नागरिकांना कामावर ठेवतील, त्यांच्यावर आता कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल
अशा मजुरांना नोकरी किंवा राहण्यासाठी जागा देणे हा आता गंभीर गुन्हा मानला जाणार असून, दोषी आढळल्यास संबंधितांना जेलमध्ये जावे लागू शकते
राज्य सरकारने सर्व प्रशासकीय विभागांना यासंदर्भात कडक आदेश दिले आहेत. पोलिसांनी अशा मजुरांची ओळख पटवून त्यांना शोधून काढण्याची मोहीम सुरू केली आहे
अनेक घुसखोरांनी बनावट आधार कार्ड किंवा इतर सरकारी कागदपत्रे मिळवल्याचे समोर आले आहे. ही कागदपत्रे तपासण्याचे आणि ती रद्द करण्याचे आदेश देण्यात आले आहेत
हे घुसखोर कमी पगारात काम करत असले, तरी त्यांच्यामुळे राज्याच्या आणि राष्ट्राच्या सुरक्षेला धोका निर्माण होऊ शकतो, असे सरकारने स्पष्ट केले आहे
मुंबईतील कंत्राटदार आणि विकासकांना आता त्यांच्याकडे एकही बांगलादेशी मजूर काम करत नसल्याचे प्रतिज्ञापत्र (Affidavit) लिहून द्यावे लागणार आहे
राज्य सरकारने नुकत्याच झालेल्या बैठकीत स्पष्ट केले आहे की, घुसखोर बांगलादेशींची ओळख पटवून त्यांना पुन्हा मायदेशी धाडण्याची प्रक्रिया वेगाने राबवली जाईल .
Post a Comment
0 Comments