एमएसएमई राष्ट्रव्यापी क्रेडिट आउटरीच कार्यक्रम शनिवारी; - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Saturday, February 7, 2026

एमएसएमई राष्ट्रव्यापी क्रेडिट आउटरीच कार्यक्रम शनिवारी;



सवलतीच्या दरात कर्ज आणि स्पॉट सॅन्शनची संधी

अमरावती, दि. ०७ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क) : सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योजकांना (MSME) बळ देण्यासाठी सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या माध्यमातून 7 फेब्रुवारी 2026 रोजी अमरावतीत विशेष 'राष्ट्रव्यापी क्रेडिट आउटरीच' कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दस्तूर नगर येथील ओल्ड बायपास रोडवरील कमल प्लाझा येथे सकाळी 11 वाजता हा सोहळा पार पडणार असून, उद्योजकांना एकाच छताखाली बँकेच्या विविध योजना, सबसिडी आणि कर्ज सुविधांबाबत सविस्तर मार्गदर्शन मिळणार आहे. या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी म्हणून सेंट्रल बँक ऑफ इंडिया, मुंबई येथील उपमहाव्यवस्थापक  हेमंत शर्मा उपस्थित राहणार असून, विशेष व्याख्याते सनदी लेखापाल पंकज अग्रवाल एमएसएमई कर्जातील सबसिडी योजनांवर प्रकाश टाकणार आहेत. तसेच बडनेरा एमआयडीसी असोसिएशनचे अध्यक्ष किरण पातूरकर यांची उपस्थिती याप्रसंगी राहणार आहे.

 या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे सहभागी उद्योजकांना पात्रतेनुसार 'इनप्रिन्सिपल सॅन्शन लेटर' घटनास्थळीच उपलब्ध करून दिले जाणार आहे. सेंट्रल बँकेच्या एमएसएमई महोत्सवांतर्गत उद्योजकांना सर्वात कमी व्याजदर आणि प्रक्रिया शुल्कात विशेष सवलतींचा लाभ घेता येईल. यासोबतच उद्यम नोंदणी आणि जीएसटी अनुपालनाबाबतही तज्ज्ञांकडून मार्गदर्शन केले जाणार आहे. अमरावतीतील नवउद्योजक आणि प्रस्थापित व्यावसायिकांनी आपल्या व्यवसाय विस्तारासाठी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन अमरावतीचे जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक नरेश हेडाऊ यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी उद्योजकांनी सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या जवळच्या शाखेशी संपर्क साधावा.


Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages