योजनेच्या लाभार्थ्यांनी ह्यातीची नोंद घेण्याचे आवाहन - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Wednesday, February 4, 2026

योजनेच्या लाभार्थ्यांनी ह्यातीची नोंद घेण्याचे आवाहन


अमरावती, दि. ०५ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क) : संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांनी 31 मार्चपर्यंत ह्यातीची नोंद घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

दरवर्षी 1 जानेवारी ते 31 मार्च या कालावधीत लाभार्थ्यांनी त्यांचे योजनेबाबतचे मासिक अनुदान ज्या बँक खाते, पोसट ऑफीसमध्ये जमा होते, अशा बँक मॅनेजर अथवा पोस्ट ऑफीसमध्ये पोस्ट मास्टर यांचे समक्ष हजर राहून स्वतः ह्यात असल्याची नोंद घ्यावी, अथवा विहीत नमुन्यात ह्यात असल्याची नोंद घेऊन मॅनेजर, पोस्टमास्टर यांच्या सही, शिक्का घ्यावा. सदर विहीत नमुना बॅंक, पोस्ट ऑफीस किंवा अमरावती तहसिल कार्यालयात सादर करावेत, असे आवाहन संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या तहसिलदार डॉ. प्रियंका मिसाळ यांनी केले आहे.


Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages