ॲड. निलेश हेलोंडे पाटील यांचा दौरा - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Monday, February 9, 2026

ॲड. निलेश हेलोंडे पाटील यांचा दौरा



अमरावती, दि. १० (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क) : कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष ॲड. निलेश हेलोंडे पाटील हे आज मंगळवार, दि. 10 फेब्रुवारी रोजी जिल्ह्याचा दौरा करणार आहेत.

दौऱ्यानुसार, मंगळवार, दि. 10 फेब्रुवारी रोजी दुपारी 12.30 वाजता विभागीय आयुक्त कार्यालयातील मिशनच्या कार्यालयात उपस्थित राहतील. दुपारी 3 वाजता तामसवाडी फाटा, ता. दर्यापूर येथे शिवछत्रपती शंकरपट कार्यक्रमास उपस्थित राहतील.

दुपारी 4.30 वाजता वडाळगव्हाण, ता. दर्यापूर येथे देवेश अशोक वडाळ यांचे शेतामध्ये कापूस काढणी यंत्राची पाहणी करतील. त्यानंतर सोईनुसार काटोलकडे प्रयाण करतील.


Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages