Type Here to Get Search Results !

Gramin Uday Logo

Gramin Uday Logo

मोर्शी येथे शुक्रवारी ‘मेगा कृषी क्रेडिट आऊटरीच’ कार्यक्रम


शेतकऱ्यांना कर्ज मंजुरी पत्रांचे होणार वितरण

अमरावती, दि. १२ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क): सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या वतीने मोर्शी येथे विशेष ‘मेगा कृषी क्रेडिट आऊटरीच’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा शेतकरी मेळावा येत्या शुक्रवारी, 13 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 11 वाजता शिरभाते मंगलम, अमरावती रोड, मोर्शी येथे पार पडणार असून, यामध्ये बँकेच्या विविध नवीन शेती योजनांचे सादरीकरण आणि पात्र शेतकऱ्यांना प्रिन्सिपल सॅन्शन चेकचे वितरण करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमाला मुख्य अतिथी म्हणून मोर्शीचे उपविभागीय अधिकारी प्रदीपकुमार पवार, गट विकास अधिकारी प्रिती खाटिंग, सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या मुंबई कार्यालयाचे उपमहाव्यवस्थापक जयशंकर प्रसाद उपस्थित राहणार आहेत. या मेळाव्यात बँक अधिकाऱ्यांमार्फत शेती कर्ज, शासनाच्या नवीन योजना आणि विविध सबसिडींबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन लाभणार आहे. या कार्यक्रमात सहभागी शेतकऱ्यांना बँकेच्या योजनांची माहिती देण्यासोबतच व्याजदरातील सवलतींबाबतही सादरीकरण केले जाईल. शासन आणि बँकेच्या या संयुक्त उपक्रमामुळे मोर्शी तालुक्यातील शेतकऱ्यांना आपला कृषी व्यवसाय विस्तारण्यासाठी संधी उपलब्ध होणार आहे. तालुक्यातील जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी या मेळाव्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन अग्रणी बँकेचे जिल्हा व्यवस्थापक नरेश हेडाऊ यांनी केले आहे.


Post a Comment

0 Comments