अमरावती, दि. ४ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क) : महिला आर्थिक विकास महामंडळातर्फे 'जेंडर ट्रान्सफॉर्मेटिव्ह मेकॅनिझम' प्रकल्पांतर्गत ग्रामसेवकांसाठी एक दिवसीय प्रशिक्षण पार पडले. 'जेंडर सेन्सिटायझेशन' आणि 'जेंडर बजेटिंग' यावर हे प्रशिक्षण पार पडले.
मुख्य कार्यकारी अधिकारी संजीता मोहपात्रा यांनी प्रशिक्षणाचे उद्घाटन क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेच्या पूजनाने केले. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब बायस, विभागीय सल्लागार राजू इंगळे, पवन देशमुख, माविमचे वरिष्ठ जिल्हा समन्वय अधिकारी डॉ. रंजन वानखडे, साधन व्यक्ती. आनंद पवार आणि अकोलाचे जिल्हा समन्वय अधिकारी वर्षा खोब्रागडे उपस्थित होते.
श्रीमती मोहपात्रा यांनी प्रशिक्षणाचे महत्त्व सांगून ग्रामसेवकांनी 'जेंडर सेन्सिटायझेशन'साठी आपल्या कार्यक्षमतेचा वापर करावा, असे आवाहन केले. श्री. बायस यांनी ग्रामपंचायतीच्या कार्यप्रणालीविषयी मार्गदर्शन केले.
डॉ. रंजन वानखडे यांनी प्रास्ताविक केले. राजू इंगळे यांनी माविमची पार्श्वभूमी सांगितली. आनंद पवार यांनी प्रशिक्षणाचा उद्देश आणि स्वरूप स्पष्ट केले. वर्षा खोब्रागडे यांनी सूत्रसंचालन केले. जिल्हा समन्वय अधिकारी ऋषिकेश घ्यार यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी उपजीविका सल्लागार अभिजित काळमेघ यांनी सहकार्य केले.
Post a Comment
0 Comments