Type Here to Get Search Results !

Gramin Uday Logo

Gramin Uday Logo

एक आठवण,अजित दादांची


     डॉ. नरेंद्र राऊत

दि. ३ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क):-

मा.अजित दादा फलोद्यान मंत्री असताना अमरावती ला आले असता आम्ही संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनी आ.संजय भाऊ खोडके यांचे माध्यमातून एक सभा विश्राम गृहावर आयोजित केली होती.त्यामध्ये दादां नी सर्व कृषी अधिकाऱ्यांना सुद्धा बोलविले होते.त्या सभेत संत्रावर येणाऱ्या 'फायटोपथोरा ' या रोगावर चर्चा झाली.हा रोग संत्रा झाडांवर का येतो अशी विचारणा मा.अजित दादा नी कृषी अधिकाऱ्यांना केली.अधिकाऱ्यांनी थातूर मातुर उत्तरे दिलीत.परंतु त्याच सभेत मी सर्वांना संत्रा झाडांवर हा रोग येण्याचे मूळ कारण सांगितले व त्याला कृषी अधिकारी कसे जबाबदार आहेत हे सांगितले .ही बाब मा.अजित दादा यांना पटली.

त्यांनी ही सभा झाल्या नंतर लगेच मला त्यांच्या लाल दिव्याच्या गाडीत बसविले व थेट DPDC च्या सभे मध्ये घेऊन गेले, व त्या सभेत कृषी उप सहसंचालका समोर हा रोग येण्याचे कारण सांगावयास लावले.त्या नंतर दादांनी सर्व कृषी अधिकाऱ्यांना धारेवर धरले व मी सुचविलेल्या उपाय योजना वर अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले.या सभे नंतर त्यांनी मला मुंबईला येण्याचे निमंत्रण दिले.

तसेच त्याच सभेत मी मोर्शी येथील संत्रा ग्रेडिंग व पॅकेजिंग हा प्रकल्प बंद असल्याचे निदर्शनास आणून दिले असता हे केंद्र मी तुम्हालाच चालवायला देतो व शासनाची काय मदत लागेल ते मला सांगा असे असे म्हटले.मी हे केंद्र चालविण्यास असमर्थता दाखविली असता ते म्हणाले की तुमच्या सारखे सधन संत्रा उत्पादक शेतकरी पुढाकार घेत नसतील तर शासन स्वतः काय काय करणार? असा खडा सवाल त्यांनी उपस्थित केला.पण दादांना हे माहीत नसेल की इथला संत्रा उत्पादक शेतकरी कर्ज बाजारी आहे.

तसेच मोर्शी काटोल येथे मंजूर झालेला संत्रा प्रक्रिया कारखाना मा.अशोक चव्हाण यांनी नांदेड येथे पळविल्याचे देखील लक्षात आणून दिले आहे.


डॉ. नरेंद्र राऊत

Post a Comment

0 Comments