*'आयएफएस', 'आयपीएस' अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन
अमरावती, दि.४ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क) : स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आणि अधिकारी बनण्याचे स्वप्न पाहणाऱ्या युवकांसाठी जिल्हा प्रशासनातर्फे शुक्रवार, दि. 6 फेब्रुवारी 2026 रोजी दुपारी 3 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन भवनात विशेष स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
या शिबिराचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे नुकतेच यश संपादन केलेले दोन अधिकारी विद्यार्थ्यांना उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. 2022 बॅचचे भारतीय वन सेवेत निवड झालेले प्रांजल चोपडे आणि 2024 बॅचचे भारतीय पोलिस सेवेत निवड झालेले सागर भामरे मार्गदर्शन करणार आहेत. दोन्ही मार्गदर्शक अभियांत्रिकी पार्श्वभूमीचे असून त्यांनी अत्यंत कमी वेळात यूपीएससीसारख्या कठीण परीक्षेत यश मिळवले आहे. त्यामुळे त्यांचा अनुभव नवोदित विद्यार्थ्यांसाठी दिशादर्शक ठरणार आहे.
जिल्हा प्रशासनाने हे शिबिर पूर्णतः विनामूल्य ठेवले असून, परीक्षेची रणनीती, अभ्यासाचे नियोजन आणि मुलाखतीची तयारी या विषयांवर शिबीरात सखोल चर्चा केली जाणार आहे. विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
Post a Comment
0 Comments