Type Here to Get Search Results !

Gramin Uday Logo

Gramin Uday Logo

"लाडकी बहीण योजनेला आचारसंहितेचा ब्रेक; निवडणूक आयोगाने जानेवारीचा आगाऊ हप्ता रोखला!"



"बहिणींना प्रतीक्षाच! निवडणुकीमुळे जानेवारीचे १५०० रुपये तूर्तास मिळणार नाहीत."
अमरावती दि. १३ :- राज्य निवडणूक आयोगाने (SEC) महापालिका निवडणुकांच्या आदर्श आचारसंहितेचे कारण देत राज्य सरकारला जानेवारी महिन्याचा हप्ता आगाऊ देण्यास मज्जाव केला आहे 
आदेशाचे कारण: मुंबईसह २९ महापालिकांच्या निवडणुका १५ जानेवारी रोजी होत आहेत  या मतदानाच्या तोंडावर मतदारांना आकर्षित करण्यासाठी जानेवारीचा हप्ता आधीच दिला जाऊ नये, असे आदेश आयोगाने दिले आहेत 
नेमका निर्णय: आयोगाने स्पष्ट केले आहे की, योजनेचे नियमित किंवा पूर्वीचे प्रलंबित हप्ते (उदा. डिसेंबरचा हप्ता) महिलांच्या खात्यात जमा करता येतील, मात्र जानेवारी २०२६ चा हप्ता आगाऊ स्वरूपात देता येणार नाही 
राजकीय पार्श्वभूमी: राज्य सरकार मकरसंक्रांतीनिमित्त (१४ जानेवारीला) डिसेंबर आणि जानेवारीचे मिळून एकत्रित ३,००० रुपये देण्याच्या तयारीत असल्याची चर्चा होती . यावर काँग्रेसने आक्षेप घेत निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती, त्यानंतर आयोगाने हा निर्णय घेतला 
नवीन लाभार्थी: आचारसंहितेच्या काळात नवीन लाभार्थ्यांची निवड करण्यासही आयोगाने बंदी घातली आहे 
या निर्णयामुळे लाभार्थी महिलांना आता केवळ डिसेंबरचा प्रलंबित हप्ता मिळण्याची शक्यता असून, जानेवारीचा हप्ता निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यावरच मिळण्याची चिन्हे आहेत.

Post a Comment

0 Comments