अमरावती, दि. १३ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क) : तृतीयपंथीयांना तक्रार नोंदविण्यासाठी हेल्पलाईन सुरू करण्यात आली. याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
केंद्र शासनाने ट्रान्सजेंडर व्यक्ती हक्काचे संरक्षण कायदा 2019 व नियम 2020 संपूर्ण देशात लागू झाला आहे. त्याअनुषंगाने तृतीयपंथीय समाजातील व्यक्तींसाठी केंद्र शासनातर्फे स्वतंत्र पोर्टल तयार करण्यात आले आहे. या पोर्टलवर तृतीयपंथीयांसाठी 14427 हा राष्ट्रीय हेल्पलाईन क्रमांक जाहिर करण्यात आला आहे. या हेल्पलाईन क्रमांकाद्वारे तृतीयपंथीय व्यक्तींना योजनांची माहिती, अर्ज प्रक्रिया संबंधित मार्गदर्शन, अडचणीचे निराकरण, तसेच तक्रारी नोंदविण्यासाठी केंद्र शासनाची तृतीयपंथीय हेल्पलाईन सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.
गरजूंनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन समाज कल्याणच्या प्रादेशिक उपायुक्त माया केदार, सहायक आयुक्त राजेंद्र जाधवर यांनी केले आहे.
--
Post a Comment
0 Comments