भीमा कोरेगाव प्रतिकृती विजय स्तंभ शूरवीरांना मानवंदना महार रेजिमेंट बटालियन समवेत धम्मराज नाजूकराव नवले. - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Friday, January 2, 2026

भीमा कोरेगाव प्रतिकृती विजय स्तंभ शूरवीरांना मानवंदना महार रेजिमेंट बटालियन समवेत धम्मराज नाजूकराव नवले.



अमरावती दिनांक ३ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क)

    १ जानेवारी २०२६ रोजी भीमा कोरेगाव  येथील विजय स्तंभाचा २०८ वा शौर्य दिन मोठ्या उत्साहात आणि लष्करी शिस्तीत साजरा झाला आहे    

भीमा कोरेगाव विजय स्तंभ: शूरवीरांना मानवंदना 

महार रेजिमेंटची मानवंदना: विजयस्तंभाला भेट देऊन शौर्यगाथा घडविणाऱ्या शूरवीरांना महार रेजिमेंट बटालियन समवेत धम्मराज नवले यांनी भावपूर्ण मानवंदना अर्पण केली आहे. या विजयस्तंभावर महार रेजिमेंटच्या आजी-माजी सैनिकांनी दरवर्षीप्रमाणे यंदाही लष्करी परंपरेनुसार मानवंदना दिली. ऐतिहासिक शौर्यगाथेचे प्रतीक असलेल्या या स्तंभाला लष्करी बँड आणि सलामी देऊन शूरवीरांच्या स्मृतींना उजाळा देण्यात आला.

नववर्षाचे स्वागत करत  यावेळी त्यांनी विजयस्तंभ हा केवळ स्मारक नसून तो शौर्य, स्वाभिमान व संघर्षाचे अमर प्रतीक असल्याचे मत व्यक्त केले.

धम्मराज नाजूकराव नवले व सहकारी: विजय स्तंभाच्या ऐतिहासिक वारशाचे जतन करण्यासाठी आणि समाज बांधवांना या शौर्याची माहिती देण्यासाठी धम्मराज नाजूकराव नवले यांच्यासह अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी या सोहळ्यात सक्रिय सहभाग नोंदवला. त्यांनी महार रेजिमेंटच्या बटालियन समवेत शूरवीरांना अभिवादन केले.

प्रतिकृतीचे पूजन: राज्यभरातील विविध गावांमध्ये आणि शहरांमध्ये भीमा कोरेगाव विजय स्तंभाची प्रतिकृती उभारून अभिवादन सोहळे पार पडले 

या नववर्षामध्ये बाबासाहेबांनी सांगितलेल्या “शिका, संघटित व्हा, संघर्ष करा” या मार्गावर चालण्याचा प्रयत्न तरुणांनी करावा, असे त्यांनी संबोधित केले.

लाखोंची उपस्थिती: यंदाही देशभरातून लाखो अनुयायी आणि भीम सैनिक पेरणे फाटा येथील विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी दाखल झाले होते.

शासकीय मानवंदना: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी देखील १ जानेवारी रोजी विजयस्तंभास पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले .

विजयस्तंभाच्या परिसर सजावटीकरिता यावेळी संविधानाची थीम ठेवण्यात आली होती. स्वातंत्र्य, समता, बंधुता या संवैधानिक मूलतत्त्वांचा आपण सर्वांनी अंगीकार करावा.

या कार्यक्रमास मोठ्या प्रमाणावर जनसमुदाय उपस्थित होता. संपूर्ण परिसरात उत्साह, अभिमान आणि चैतन्याचे वातावरण पाहायला मिळाले.

     भीमा कोरेगाव या शौर्य विजय स्तंभाचा पराक्रमी इतिहास सांगत असतांना धम्मराज नवले यांनी प्रमुख वक्ते व पाहुणे म्हणून भीम ज्योती आम्रपाली बुद्धविहार येथे विचारांची देवाण-घेवाण केली ५०० महारांनी २८००० पेशवाईवर विजय मिळवला या इतिहासाची साक्ष आजच्या तरुण वर्गाला त्या रक्ताची जाणीव असणे गरजेचे आहे.

हा दिवस केवळ एका विजयाचा उत्सव नसून, तो महार सैनिकांच्या शौर्याचा, स्वाभिमानाचा आणि समतेच्या लढ्याचा प्रेरणादायी दिवस म्हणून साजरा केला जातो .

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages