शिरजगाव कसबा येथील श्री बालमुकुंद राठी विद्यालयात वार्षिकोत्सव उत्साहात संपन्न
श्री बालमुकुंद राठी विद्यालयात सांस्कृतिक कार्यक्रमांचा जल्लोष; विद्यार्थ्यांनी गाजवला रंगमंच
शिरजगाव कसबा दिनांक ८ (सौ. विद्या दाभाडे)
(ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क)
शिरजगाव कसबा:स्थानिक श्री बालमुकुंद राठी विद्यालयात रविवार, ४ जानेवारी २०२६ रोजी वार्षिक सांस्कृतिक कार्यक्रमाचे अतिशय दिमाखदार आयोजन करण्यात आले होते. 'कलाविष्कार २०२६' या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी आपल्या सुप्त गुणांचे दर्शन घडवत उपस्थितांची मने जिंकली.त्यानंतर संगीताच्या तालावर विद्यार्थ्यांनी एकापेक्षा एक सरस कलाकृती सादर केल्या. कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरले ते म्हणजे महाराष्ट्राची संस्कृती दर्शविणारे "पंढरीची वारी. "
गावातील शैक्षणिक क्षेत्रात अग्रण्य व नावलौकिक असलेल्या श्री बालमुकुंद राठी विद्यालयात दरवर्षी प्रमाणे या वर्षीही वार्षिकोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. याअंतर्गत बालमेळावा, क्रीडा स्पर्धा तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी शाळेच्या विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. चिमुकल्यांच्या कलागुणांना दाद देण्यासाठी उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला.
रविवारी ता .४ जानेवारी रोजी संपन्न झालेल्या सांस्कृतिक कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष डॉ. विजय राठी हे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते तसेच विशेष अतिथी म्हणून श्यामसुंदर राठी, उपाध्यक्ष, प्रशांत राठी, सचिव, विनित राठी, कोषाध्यक्ष, संदीप राठी, सुधीर गणेडीवाल, तन्मय गणेडीवाल, नलिन पडिया, , सुशील बागडिया, निलेश परताणी, प्रशांत अग्रवाल, संचालक, वंशोदय पब्लिक स्कूल, अमरावती, ऋषभ सिकची, श्रीमती अंबिका सिकची, अमरावती हे पाहुणे प्रामुख्याने उपस्थित होते
प्रमुख अतिथींच्या शुभहस्ते रांगोळी व कलादालनाचे उदघाटन करण्यात आले विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या सुबक रांगोळी तथा हस्तकलेच्या वस्तू पाहून अतिथीनी आनंद व्यक्त केला सांस्कृतिक कार्यक्रमांचे रितसर उदघाटन करतांना निलेश परतानी यांच्या हस्ते करण्यात आले
सांस्कृतिक कार्यक्रमात जवळपास ३२५ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता यात प्रामुख्याने स्त्री शक्तीचा जागर, गोंधळ, अंधश्रद्धा निर्मूलन ,आदिवासी संस्कृती, हरियाणाची संस्कृती, आधुनिक भारतीय संस्कृती पारंपरिक नृत्य, लावणी यासह अनेक नृत्यप्रकार सादर केले गेले. कार्यक्रमात सादर झालेल्या दिंडी नृत्याने सर्व प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले. यात विद्यालयातील जवळपास ९० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. सर्वच कार्यक्रमांना विद्यार्थी तथा पालकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. दरवर्षी प्रमाणे या वर्षीही पालकांची खूप मोठी उपस्थिती लाभली होती उपस्थित अतिथींनी कार्यक्रमात सहभागी विद्यार्थ्यांना रोख बक्षीस देऊन उत्साह वाढविण्यात आला
उद्घाटनपर कार्यक्रमाचे संचलन श्री गायकवाड यांनी तर प्रास्ताविक मुख्याध्यापक सतीश सुरडकर यांनी व अध्यक्षीय मनोगत अश्विन राठी यांनी व्यक्त केले आभार प्रदर्शन श्री नवलकर सर यांनी केले सांस्कृतिक कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री श्रीवास सर यांनी केले.तर आभार प्रदर्शनाने सोहळ्याची सांगता झाली. या वार्षिकोत्सवामुळे शिरजगाव कसबा परिसरात आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले
Post a Comment
0 Comments