अमरावती, दि. ८ : मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक आद्य पत्रकार ‘दर्पणकार’आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ विभागीय माहिती कार्यालयात पत्रकार दिन दि.६ जानेवारी ला साजरा करण्यात आला. यानिमित्त उपसंचालक (माहिती) अनिल आलुरकर यांनी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
6 जानेवारी 1832 रोजी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी "दर्पण" हे मराठीतलं पहिलं वृत्तपत्र सुरू करत मराठी पत्रकारितेचा पाया रचला. त्याचे स्मरण करण्यासाठी महाराष्ट्रात 6 जानेवारी हा दिवस "पत्रकार दिन" किंवा "दर्पण दिन" म्हणून साजरा केला जातो. त्यांनी पत्रकारीतेच्या क्षेत्रात भरीव योगदान दिले असून पत्रकारांसाठी त्यांचे कार्य दिपस्तंभाप्रमाणे सदैव मार्गदर्शक ठरेल, असे श्री. आलुरकर यांनी यावेळी सांगीतले.
यावेळी सहायक संचालक (माहिती) विजय राऊत, प्रदर्शन सहायक विश्वनाथ धुमाळ, सहाय्यक अधिक्षक विजया लोळगे, वरिष्ठ लिपीक दिनेश धकाते, श्रीमती वैशाली ठाकरे, सुनील काळे, कॅमेरा सहाय्यक मो. शेख हबीब, कुमार हरदुले, छायाचित्रकार मनीष झिमटे, लिपीक जयप्रकाश बानाईत, राहुल साबळे, सिध्दांत गौरखेडे, प्रगती कल्पेकर, अनिल वाडाणे, श्रीमती कांचन अंधारे, दिपाली ढोमणे आदी उपस्थित होते. यावेळी उपस्थितांनीही आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्प वाहून अभिवादन केले.
Post a Comment
0 Comments