Type Here to Get Search Results !

Gramin Uday Logo

Gramin Uday Logo

प्रजासक्ताकदिनी देशभक्तीपर गीतांवर आधारित सामुहिक कवायत


    


   
 
अमरावती, दि. २२ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क): प्रजासत्ताक दिनानिमित्त 26 जानेवारी 2026 रोजी देशभक्तीपर गीतांवर  विद्यार्थ्यांचे सामुहिक कवायत संचलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हास्तरावर एकुण चार शाळा एकत्रित कवायत परेड मैदान, अमरावती येथे होणार असून या कवायतीसाठी 1 हजार 500 विद्यार्थी सहभागी होणार आहेत. जिल्ह्यातील 14 तालुक्यांमध्ये प्रत्येक शाळेमधून व सामुहिकरित्या प्रत्येक तालुक्यातील तीन शाळा एकत्र येवून शाळेच्या मैदानावर देशभक्तीपर गीतांवर आधारित सामुहिक कवायत संचलन कार्यक्रम घेण्यात येणार आहे. त्यासाठी दीड महिन्यांपासून शाळास्तरावर कवायत सराव  सुरु आहे. या दिवशी विद्यार्थ्यांना शाळेकडून बिस्कीट, केळी आणि पाणी वाटप होणार आहे. याबाबत गट शिक्षणाधिकारी, मुख्याध्यापक यांना सुचित करण्यात आले असल्याचे माध्यमिक शिक्षणाधिकारी यांनी कळविले आहे.


Post a Comment

0 Comments