अमरावती, दि. २२ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क): नैसर्गिक वाळूला एम-सॅण्ड (कृत्रिम वाळू) पर्याय म्हणून कृत्रिम वाळू धोरणाच्या सवलतींचा लाभ घेण्यासाठी जिल्ह्यात कार्यरत असलेले मंजूर खाणपट्टाधारक, तात्पुरता परवानाधारक व कोणत्याही प्रकाराचा खाणपट्टा नसलेले, परंतु एम-सॅण्ड युनिट स्थापन करून कृत्रिम वाळूची निर्मिती करू इच्छित व्यक्ती, संस्था यांनी कागदपंत्रासह जिल्हाधिकारी कार्यालय येथे अर्ज करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी केले आहे.
या अर्जासोबत गट नंबर, नकाशा, सातबारा उतारा, वैयक्तिक अर्ज, असल्यास आधार कार्ड, पॅन कार्ड, संस्थेचा अर्ज, असल्यास संस्थेबाबतची कागदपत्रे, अर्ज फी रक्कम 500 रूपये, तसेच एम-सॅण्ड युनिट ज्या ठिकाणी स्थापन करावयाचे आहे, त्या ठिकाणचे महाराष्ट प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्याकडील कॉन्सेंट टू एस्टॅब्लिश व कॉन्सेंट टू ऑपरेटबाबतचे प्रमाणपत्र, 100 टक्के एम-सॅण्ड युनिट उत्पादित करण्याबाबतचे 100 रूपयाच्या स्टॅम्पपेरवरील हमीपत्र, तसेच एम-सॅण्ड उत्पादित करण्यासाठी दगड कोणत्या खाणपट्टातून किंवा इतर स्त्रोतांतून आणण्यात येणार आहे, त्या खाणपट्टाच्या अथवा स्त्रोतांचा तपशील, एम-सॅण्ड युनिट बसविण्यात येणार आहे. अशा क्षेत्राबाबत संबंधित नियोजित प्राधिकरणाकडून त्याबाबतचा वापर अनुज्ञेय आहे किंवा कसे याबाबतचे ना हरकत प्रमाणपत्र, आवश्यक त्याठिकाणी अकृषिक परवानगी आदेश, तसेच उद्योग आधार नोंदणी असणारे प्रमाणपत्र व व्यापारी परवाना घेणे बंधनकारक आहे. ज्या व्यक्ती, संस्था यांना हेतुपत्र देण्यात आले आहे. अशांना महसूल व वनविभाच्या निर्णयामधील औद्योगिक प्रोत्साहन अनुदान, व्याज अनुदान, विद्युत शुल्कातून सूट व वीज दर अनुदान राहील. गुंतवणूक प्रोत्साहन अनुज्ञेय असेल. रॉयल्टी प्रतिब्रास 400 रूपये सवलत 200 रूपये प्रतिब्रास दराची तरतूद आहे.
शंभर टक्के एम-सॅण्ड कृत्रिम वाळू उत्पादित करून इच्छिणाऱ्या व्यक्ती, संस्था यांनी, तसेच यापूर्वी संबंधित एम-सॅण्ड उत्पादन करणाऱ्या युनिटधारकाने महाखनिज या संगणक प्रणालीवर अर्ज केला असल्यास त्यांनी पुन्हा नव्याने जिल्हाधिकारी यांच्याकडे अर्ज करणे आवश्यक राहील. याबाबत काही अडचणी अथवा शंका असलेस गौणखजिन शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
Post a Comment
0 Comments