पोलीस मुख्यालय मैदानावर प्रजासत्ताक दिनाचा मुख्य शासकीय सोहळा - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Monday, January 19, 2026

पोलीस मुख्यालय मैदानावर प्रजासत्ताक दिनाचा मुख्य शासकीय सोहळा


अमरावती, दि. २०  (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क) : भारताच्या ७७ व्या प्रजासत्ताक दिनाचा मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळा यावर्षी पोलीस मुख्यालय, अमरावती शहर परेड मैदान येथे आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम २६ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ९.१५ वाजता पार पडणार आहे.

दरवर्षी प्रजासत्ताक दिनाचा मुख्य सोहळा अमरावती येथील जवाहरलाल नेहरू स्टेडियम येथे साजरा केला जातो. मात्र, या स्टेडियमवर ४०० मीटर रनिंग ट्रॅकचे काम सुरू आहे. या कामामुळे यावर्षी कार्यक्रम घेणे शक्य नसल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे २६ जानेवारी २०२६ चा सोहळा पोलीस मुख्यालय परेड मैदानावर घेण्यात येणार आहे, असे निवासी उपजिल्हाधिकारी संतोष काकडे यांनी कळविले आहे.


--

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages