अमरावती, दि. १९ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क): मेस्को क्षेत्रीय कार्यालय, सैनिकी मुलांचे वसतिगृह नवसारी, अमरावती येथे भारतीय संरक्षण दलातून निवृत्त झालेल्या माजी सैनिकांसाठी 'लिपिक नि टंकलेखक' या पदाच्या एकूण दोन जागांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या पदासाठी सशस्त्र सेना दलातील निवृत्त जेसीओ, ओआर, वीर पत्नी अर्ज करू शकतात. उमेदवाराचे वय 57 वर्षांपेक्षा जास्त नसावे आणि तो महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा. शैक्षणिक पात्रतेमध्ये मराठी भाषेचे ज्ञान, एम.एस. ऑफिस, अकाऊंटिंग आणि मराठी व इंग्रजी टायपिंगचे मूलभूत ज्ञान असणे आवश्यक असून त्याबाबतचे प्रमाणपत्र जोडणे अनिवार्य आहे.लष्करी सेवेत कार्यालयीन अधीक्षक किंवा मुख्य लिपिक पदाचा अनुभव असलेल्यांना निवडीत प्राधान्य दिले जाईल. तसेच उमेदवाराची वैद्यकीय श्रेणी शक्यतो 'शार्प-1' असावी.
निवड झालेल्या उमेदवारास दरमहा तीस हजार रुपये मानधन दिले जाईल. इच्छुकांनी आपले अर्ज 5 जानेवारी 2026 पर्यंत ro-amravati@mescoltd.co.in या ई-मेलवर किंवा 'क्षेत्रीय कार्यालय अमरावती, सैनिकी मुलांचे वसतिगृह, नवसारी, अमरावती-४४४६०४' या पत्त्यावर पोस्टाने पाठवावेत. अधिक माहितीसाठी संपर्क क्रंमाक-0271-2952040, मोबाईल नंबर- 9373164962 तसेच ७४९५०९७९५८ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Post a Comment
0 Comments