Type Here to Get Search Results !

Gramin Uday Logo

Gramin Uday Logo

अमरावती आयटीआयमध्ये सोमवारी शिकाऊ उमेदवारी भरती मेळावा

  


अमरावती, दि. १२ : येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत सोमवार, दि. १५ डिसेंबर रोजी सकाळी १०  वाजता प्रधानमंत्री राष्ट्रीय शिकाऊ भरती मेळावा घेण्यात येणार आहे. या भरती मेळाव्यामध्ये भरतीसाठी चाकण, पुणे येथील महिंद्रा आणि महिंद्रा कंपनी सहभागी होणार आहे.

मेळाव्यासाठी आयटीआयमध्ये इलेक्ट्रीशियन, इलेक्ट्रॉनिक्स - मेकॅनिक, इंस्ट्रुमेन्ट मेकॅनिक, मेकॅनिक मशिन टुल मेंटनन्स, मशिनिस्ट, मशिनिस्ट (ग्राइंडर), मेकॅनिक (मोटर व्हेइकल), मेकॅनिक डिझेल, मेकॅनिक रेफ्रिजरेशन आणि एअर कंडिशन, मेकॅनिक ट्रॅक्टर, फिटर, टर्नर, पेन्टर (जनरल), प्लास्टिक प्रोसेसिंग ऑपरेटर, पंप ऑपरेटर कम मेकॅनिक, डिझेल-मेकॅनिक, शिट मेटल वर्कर, टूल अॅन्ड डाइमेकर (प्रेस टूल, जिग्स अॅन्ड फिक्सचर) वायरमन, वेल्डर (गॅस अॅन्ड इलेक्ट्रीक) इत्यादी व्यवसाय उत्तीर्ण १८- २८ वयोगटातील प्रशिक्षणार्थी उमेदवांरानी सहभागी व्हावे. प्रशिक्षणार्थ्यांनी बायोडाटा आणि मुळ कागदापत्रासह झेरॉक्स प्रती सोबत आणणे आवश्यक आहे.

तसेच आयटीआयमध्ये प्रशिक्षण घेत असलेल्या प्रशिक्षणार्थ्यांसाठी मार्गदर्शन शिबिर घेण्यात येणार आहे. याचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहाय्यक प्रशिक्षणार्थी सल्लगार एस. के. बोरकर यांनी केले आहे.


Post a Comment

0 Comments