Type Here to Get Search Results !

Gramin Uday Logo

Gramin Uday Logo

मोर्शी खुले कारागृहात मानवी हक्काबाबत मार्गदर्शन


 


अमरावती, दि.१२ : मोर्शी येथील खुले कारागृहात बंद्यांसाठी मानवी हक्क आणि संरक्षण या विषयावर कायदेविषयक जागृती कार्यक्रम बुधवार, दि. 10 डिसेंबर रोजी पार पडला.

राज्य विधी सेवा प्राधिकरण आणि राज्य मानवी हक्क आयोग, कारागृह विभागाच्या वतीने आंतरराष्ट्रीय मानवी हक्क दिवसानिमित्त मानवी हक्क आणि संरक्षण या विषयावर कायदेविषयक जागृती कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी व्ही. बी. वानखडे, एस. व्ही. खांडेकर, डी. एस. वमने, कारागृह अधीक्षक एस. एस. हिरेकर उपस्थित होते.

न्यायरक्षक कार्यालयाचे अॅड. अमित सहारकर यांनी बंद्यांचे कारागृहातील हक्क व कर्तव्ये याविषयी माहिती दिली. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव डी. एस. वमने यांनी कारागृहातील बंद्यांना जगण्याचा अधिकार, पिण्याचे पाणी व जेवणाचा अधिकार, जीविताची सुरक्षा, कायदेविषयक मदत, मनोरंजन, शिक्षण, आरोग्याचा अधिकार असल्याचे सांगितले.

ॲड. अंकुश इंगळे यांनी प्रास्ताविक केले. कारागृहाचे कृषी पर्यवेक्षक एन. व्ही.पकडे यांनी सूत्रसंचालन केले. कारागृह अधीक्षक एस. एस. हिरेकर यांनी आभार मानले.


Post a Comment

0 Comments