“जागतिक कौशल्य स्पर्धा 2026: विभागीय पात्रता फेरी उत्साहात आणि यशस्वीरित्या संपन्न”
दि.२६ अमरावती : जागतिक स्तरावर तरुणांच्या कौशल्यांना वाव देणाऱ्या आगामी 'जागतिक कौशल्य स्पर्धा 2026' साठी आयोजित करण्यात आलेली विभागीय पात्रता फेरी दि. 24 डिसेंबर 2026 रोजी अत्यंत उत्साहात पार पडली. या स्पर्धेत विभागातील अनेक गुणवंत विद्यार्थ्यांनी आपल्या कौशल्यांचे प्रदर्शन केले. या स्पर्धेच्या माध्यमातून अमरावती विभागातील प्रतिभावान युवक-युवतींना आपली कौशल्ये जागतिक स्तरावर सिद्ध करण्याची आणि अमरावती विभागाचे नाव उंचावण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे.
डॉ. श्रीकांत जिचकार सभागृह, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती येथे दि.24 डिसेंबर 2025 रोजी आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत अमरावती विभागातील अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ आणि वाशिम या पाच जिल्ह्यातील वय वर्ष 16 ते 24 या वयोगटातील 63 प्रकारच्या परंपरागत आणि आधुनिक कौशल्य गटातील उमेदवारांनी सहभाग घेतला होता. या विभागीय कौशल्य स्पर्धेत 114 उमेदवारांची स्कील टेस्ट घेण्यात आली. ही स्पर्धा संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील वेगवेगळ्या केंद्रांवर तसेच डॉ. पंजाबराव देशमुख तंत्रनिकेतन, संत गाडगेबाबा औद्योगिक प्रशिक्षण अमरावती, CADD Info, रेडीयंट हॉस्पीटल येथे आयोजित करण्यात आली होती.
या पात्रता फेरीचे उद्घाटन कुलगुरू डॉ . मिलिंद बाराहाते, संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ यांनी केले तसेच या कार्यक्रमास प्र. कुलसचिव डॉ . नितीन कोळी संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ, उपायुक्त, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता ठाकरे, सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, मार्गदर्शन केंद्र , श्रीमती प्रांजली बारस्कर, संचालक निशांत शिंघल, हेल्थी रिफायनरी प्रायवेट लिमिटेड अमरावती, पुष्कर हाते, संचालक तसेच महाराष्ट्र राज्य प्रमुख, CII, उपसंचालक सुधा ठोंबरे, शासकीय ओद्योगिक प्रशिक्षण संस्था अमरावती, संचालक इनक्युबेशन सेंटर श्रीमती स्वाती शेरेकर, संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती हे उपस्थित होते. या उद्घाटनिय कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री. अमोल मोहोड, कौशल्य विकास विभाग यांनी केले.
कार्यक्रम प्रसंगी उद्घाटकीय मार्गदर्शनामध्ये कुलगुरू डॉ. मिलिंद बारहाते यांनी सदर उपक्रमाची प्रशंसा करून यामुळे तळागाळातल्या कौशल्यांना व्यासपीठ प्राप्त झाल्याचे समाधान व्यक्त केले. या तसेच अमरावती विभागातील युवकांच्या कौशल्यांना जागतीक स्तरावर नेण्यासाठी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग प्रयत्नशील असून नक्कीच येथील तरूणाईमध्ये ती कौशल्ये असल्याचा विश्वास व्यक्त केला.
या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी कौशल्य विकास विभागीय कार्यालय, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र तसेच CII चे पदाधिकारी तसेच इंक्युबेशन सेंटर, संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती यांनी मेहनत घेतली.
Post a Comment
0 Comments